AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ठरवूनच गेलो होतो, कुणीही असो, पहिल्या बॉलवर षटकारच मारायचा’, चहलच्या मुलाखतीत इशानची सिक्रेट गोष्ट

ईशान किशनने श्रीलंकेविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारुन कारकीर्दीला दिमाखात सुरुवात केली. | india vs Sri lanka Ishan Kishan

'ठरवूनच गेलो होतो, कुणीही असो, पहिल्या बॉलवर षटकारच मारायचा', चहलच्या मुलाखतीत इशानची सिक्रेट गोष्ट
ईशान किशन
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 8:58 AM
Share

मुंबई : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेला (India vs Sri Lanka) सात विकेट्स आणि 80 चेंडू राखून लोळवलं. सलामीवीर शिखर धवन-पृथ्वी शॉ आणि तिसर्‍या क्रमांकावर खेळायला आलेल्या ईशान किशनने (Ishan Kishan) सुंदर खेळी करत पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. या तिघांनीही सामन्यात अतिशय उत्तम बॅटिंग केली. सलामीवीरांनी विजयाचा पाया रचून दिल्यानंतर ईशान किशनने मैदानात पाऊल ठेवताच पहिल्या चेंडूवर दणदणीत षटकार ठोकला. विशेष म्हणजे त्याचा हा पदार्पणाचा सामना होता आणि भरीस भर म्हणजे वाढदिनी त्याने पदार्पणाच्या सामन्यात षटकार ठोकण्याचा मान मिळवला. पदार्पणाच्या सामन्यातच ठोकलेल्या षटकारापाठीमागचं गुपित ईशान किशनने चहलला दिलेल्या मुलाखतीतून उलगडून दाखवलं.

ईशान किशनने श्रीलंकेविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारुन कारकीर्दीला दिमाखात सुरुवात केली. ईशान किशनने श्रीलंकेचा गोलंदाज धनंजया डी सिल्वाला षटकार मारत एकदिवसीय क्रिकेटचा श्रीगणेशा केला. किशनने अवघ्या 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करून सर्वांच्या नजरा आपल्याकडे खेचल्या.

कुणीही असो षटकार मारणार…!

सामना संपल्यानंतर ईशान किशनने फिरकीपटू युजवेंद्र चहलला एक खास मुलाखत दिली. या मुलाखतीत पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याची कहाणी त्यांने उलगडून दाखवली. तो म्हणाला, “कुणीही असो, मी ठरवूनच आलो होतो की पहिल्या बॉलवर षटकार मारायचा… मी माझ्या संघातील सहकाऱ्यांना देखील मी पहिला बॉलवर षटकार मारणार असं सांगितलं होतं… त्याच इराद्याने मी पहिल्याच बॉलवर षटकार मारला….”

ठरल्याप्रमाणे ‘करेक्ट कार्यक्रम’ केला…!

“50 षटकांच्या विकेटकीपिंगनंतर मला हे समजलं की विकेट गोलंदाजांना जास्त मदत करणार नाही… गोलंदाज कुणीही असो आणि चेंडू कसाही असो, पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकतो, असं मी संघातील सहकाऱ्यांना सांगून आलो होतो. ठरल्याप्रमाणे मी षटकार मारला. आनंद वाटला… माझा वाढदिवस होता, मी पदार्पण करीत होतो.. भारताने मॅच जिंकली.. भारतासाठी खेळणं खूपच आनंदाची गोष्ट आहे. माझं स्वप्न पूर्ण झालं…”, अशा भावना ईशान किशनने बोलून दाखवल्या.

(india vs Sri lanka ishan Kishan game start with Six R Premdasa Stadium Colombo)

हे ही वाचा :

पृथ्वीचा लंकेला तडाखा, धमाकेदार खेळीनंतर सेहवागचं ‘ते’ ट्विट व्हायरल, रवी शास्त्रींची घेतली मजा!

पृथ्वीचा लंकेला तडाखा, धमाकेदार खेळीनंतर सेहवागचं ‘ते’ ट्विट व्हायरल, रवी शास्त्रींची घेतली मजा!

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.