Rohit Sharma : सेमीफायनलमध्ये रोहितचा मोठा कारनामा, रेकॉर्ड्सची रांग लावली, अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज

Rohit Sharma : T20 वर्ल्ड कप 2024 च्या महत्त्वाच्या सामन्यात रोहित शर्मा आपल्या फॉर्ममध्ये आलाय. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल मॅचमध्ये तो कॅप्टन इनिंग खेळला. या मॅचमध्ये फक्त इंग्लंडलाच हरवलं नाही, तर रोहित शर्माने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

Rohit Sharma : सेमीफायनलमध्ये रोहितचा मोठा कारनामा, रेकॉर्ड्सची रांग लावली, अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज
Rohit Sharma
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 28, 2024 | 1:33 PM

रोहित शर्मा नेहमीच मोठ्या मॅचचा खेळाडू समजला जातो. त्याने ही गोष्ट सिद्ध सुद्धा केलीय. T20 वर्ल्ड कप आधी रोहितच्या फॉर्मवरुन चिंता व्यक्त केली जात होती. टुर्नामेंट दरम्यान सुरुवातीला रोहितच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. त्यावेळी एक्सपर्ट्सनी चिंता व्यक्त केली होती. सुपर-8 राऊंड सुरु होताच रोहितने आपले खर रुप दाखवलं. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 41 चेंडूत 92 धावांची वादळी खेळी केली. गुयानाच्या कठीण पीचवर इंग्लंड विरुद्ध हाफ सेंच्युरी झळकवली. त्यामुळे टीम इंडियाच्या डावाची उभारणी झाली. आता इंग्लंडला हरवून फायनलमध्ये प्रवेश केलाय. सेमीफायनलच्या महत्त्वाच्या सामन्यात रोहितने रेकॉर्ड्सची रांग लावली.

रोहित शर्मा सेमीफायनलच्या महत्त्वाच्या सामन्यात 39 चेंडूत 57 धावांची इनिंग खेळला. त्याने डावात 6 चौकार आणि 2 षटकार मारले. T20 वर्ल्ड कपमध्ये 50 सिक्स मारणारा पहिला फलंदाज बनलाय. त्याच्यानंतर विराट कोहली 33 आणि युवराज सिंगने सुद्धा इतकेच सिक्स मारलेत. त्याशिवाय रोहितने या मॅचमध्ये मोठा कारनामा केला. रोहितने याआधी वनडे वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा 50 सिक्स मारले आहेत. आता टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्याने 50 सिक्स पूर्ण केले. तीन टुर्नामेंट्समध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे.

रोहितच्या आधी विराट

रोहित शर्माने शानदार इनिंगने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. तो पहिला भारतीय कॅप्टन आहे, ज्याने T20 वर्ल्ड कपच्या नॉकआऊट मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं. सोबतच आयसीसी नॉकआऊटमध्ये सर्वाधिक (771) धावांसह दुसऱ्या नंबरवर आहे. त्याच्याआधी विराट कोहली आहे, त्याने 863 धावा केल्या आहेत.

हे तिसऱ्यांदा करुन दाखवलं

टीम इंडियाने सेमीफायनल मॅचमध्ये इंग्लंडला 68 धावांनी हरवलं. रोहित शर्मा आपल्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भारतीय टीमला आयसीसी टुर्नामेंटच्या फायनलपर्यंत घेऊन गेला आहे. या बाबतीत त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि वेस्ट इंडिजचा कॅप्टन ब्रायन लाराची बरोबरी केलीय. या बाबतीत रिकी पॉन्टिंग आणि महेंद्र सिंह धोनी रोहित शर्माच्या पुढे आहेत. या दोघांनी प्रत्येकी 4-4 वेळ आपल्या कॅप्टनशिपखाली टीमला आयसीसी टुर्नामेंटच्या फायनलमध्ये पोहोचवलं आहे.