AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी केएल राहुलने सांगितली स्ट्रॅटेजी, या खेळाडूंना मिळणार संधी

टी20 मालिकेनंतर टीम इंडियात तीन सामन्यांची वनडे मालिका दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका पहिला वनडे सामना 17 डिसेंबरला होणार आहे. जोहान्सबर्गमध्ये पहिला सामना खेळला जाणार आहे. या मालिकेची धुरा केएल राहुलकडे असून सामन्यापूर्वी रणनिती जाहीर केली आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी केएल राहुलने सांगितली स्ट्रॅटेजी, या खेळाडूंना मिळणार संधी
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत क्रीडाप्रेमींच्या मनासारखं होणार! केएल राहुलने सांगितली रणनिती
| Updated on: Dec 16, 2023 | 8:12 PM
Share

मुंबई : वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडिया दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व केएल राहुलकडे सोपवण्यात आलं आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी होत आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार केएल राहुल याने पत्रकारांशी संवाद साधला. तसेच वनडे सामन्यासाठी काय रणनिती असेल याबाबत दिलखुलासपणे सांगितलं. इतकंच काय तर कर्णधार केएल राहुल याने क्रीडाप्रेमींना एक आनंदाची बातमी देखील दिली आहे. या सामन्यात रिंकू सिंह आणि संजू सॅमसन संधी मिळणार आहे. पत्रकार परिषदेत केएल राहुल याने याबाबतचा खुलासा केला आहे. त्याचबरोबर कोणत्या स्थानावर खेळेल याबाबतचा खुलासा देखील केला आहे. रिंकू सिंह याचा पदार्पणाचा वनडे सामना असणार आहे. या सामन्यात रिंकू सिंह कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.

केएल राहुल याने पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, “संजू सॅमसन आणि रिंकू सिंह या दोघांना संधी मिळेल. संजू सॅमसन वनडे मालिकेत खेळणार आणि पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर उतरणार. दुसरीकडे, रिंकू सिंह याला वनडे फॉर्मेटमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळेल.” रिंकू सिंह याने टी20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. आता वनडे क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी कशी असेल याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

केएल राहुलने स्वत:च्या भूमिकेबाबतही पत्रकार परिषदेत सांगितलं. “वनडे मालिकेत मधल्या फळीत फलंदाजी करेल. तसेच विकेटकीपिंगची भूमिका बजावेल.” संजू सॅमसनही विकेटकिपींग करतो, पण ही जबाबदारी कर्णधार केएल राहुलने स्वत:कडे ठेवली आहे. तसेच कसोटी सामन्यात कोणतीही भूमिका बजावण्यास सज्ज असल्याचं सांगितलं आहे. मॅनेजमेंट आणि कर्णधार जी भूमिका देतील ती बजावण्यास सज्ज असल्याचं त्याने सांगितलं.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रजत पाटिदार, रिंकू सिंह,ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (कर्णधार), संजू सॅमसन, आकाश दीप, अर्शदीप सिंग, आवेश खान, दीपक चाहर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, युजवेंद्र चहल.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा