IND vs AFG : भारताचा कसोटी संघातून 10 खेळाडू आऊट! मागच्या प्लेइंग 11 च्या तुलनेत इतका बदल

India Playing XI vs Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना 6 जूनपासून सुरू होत आहे. भारतीय संघ 8 वर्षानंतर अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. असं असताना भारतीय कसोटी संघात बराच बदल झाल्याचा पाहायला मिळत आहे. चला जाणून घेऊयात कोणते खेळाडू आऊट झाले ते..

IND vs AFG : भारताचा कसोटी संघातून 10 खेळाडू आऊट! मागच्या प्लेइंग 11 च्या तुलनेत इतका बदल
IND vs AFG : भारताचा कसोटी संघातून 10 खेळाडू आऊट! मागच्या प्लेइंग 11 च्या तुलनेत इतका बदल
Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 05, 2026 | 3:31 PM

भारत आणि अफगाणिस्तान एकमेव कसोटी सामन्यासाठी आमनेसामने येत आहेत. या दोन संघात 2018 मध्ये पहिला कसोटी सामना झाला होता. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पार पडला होता. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि 262 धावांनी पराभूत केलं होतं. आता दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडणार आहेत. हा सामना न्यू चंदीगडच्या महाराज्या यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण मागच्या काही मालिकांमध्ये भारताची कसोटी कामगिरी सुमार राहिली आहे. त्यात हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिपचा भाग नाही. पण विजयानंतर टीम इंडियाला बुस्टर मिळू शकते. भारत आणि अफगाणिस्तान सामना होऊ 8 वर्षांचा कालावधी लोटला आहे. तेव्हापासून आतापर्यंत टीम इंडियात खूप बदल झाला आहे. चला जाणून घेऊयात टीम इंडिया किती बदलली आहे ती…

केएल राहुल एकमेव कॉमन खेळाडू

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळलेल्या प्लेइंग 11 मधून 10 खेळाडू आता संघाचा भाग नाहीत. मागच्या प्लेइंग 11 मधील केएल राहुल हा एकमेव खेळाडू संघात आहे. केएल राहुल या संघात उपकर्णधार म्हणून भूमिका बजावणार आहे. 2018 साली झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात मुरली विजय, शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा आणि उमेश यादव हे खेळाडू होते. यापैकी मुरली विजय, शिखर धवन, दिनेश कार्तिक आणि आर अश्विनने निवृत्ती घेतली आहे. तर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि उमेश यादवने निवृत्ती घेतली नाही, पण कसोटी संघात स्थान मिळत नाही. रवींद्र जडेजाला अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात आराम दिला आहे. तर हार्दिक पांड्या फिटनेसच्या कारणामुळे क्रिकेटपासून दूर आहे.

दहा जणांची जागा कोणत खेळाडू घेणार?

अफगाणिस्तानविरुद्ध संभाव्य प्लेइंग 11 चा अंदाज बांधला जात आहे. या संघात उपकर्णधार केएल राहुल असणार हे नक्की आहे. तर मुरली विजय आणि शिखर धवनची जागा शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल सलामीला घेईल. चेतेश्वर पुजाराच्या जागी साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. तर अजिंक्य रहाणेच्या जागी देवदत्त पडिक्कल संघात असू शकतो. विकेटकीपर फलंदाज म्हणून दिनेश कार्तिकची जागा ऋषभ पंत घेईल. अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या जागी नितीश कुमार रेड्डी असेल. आर अश्विनची जागा वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजाची जागा हर्ष दुबे घेईल. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि उमेश यादवच्या जागी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा संघाचा भाग असतील. मोहम्मद सिराजच्या फिटनेसबाबत शंका आहे. त्यामुळे जर तो खेळला नाही तर गुरनूर ब्रारला संधी मिळेल.

Follow Us