AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG Test : टीम इंडियाला अफगाणिस्तान विरुद्ध जिंकूनही wtc पॉइंट्स टेबलमध्ये होणार शून्य फायदा, कारण?

India vs Afghanistan Test : टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानच्या तुलनेत कित्येक पटीने वरचढ आहे. मात्र टीम इंडियाला अफगाणिस्तान विरुद्ध जिंकल्यानंतरही मिळणारे गुण हे डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये जोडले जाणार नाहीत. जाणून घ्या.

IND vs AFG Test : टीम इंडियाला अफगाणिस्तान विरुद्ध जिंकूनही wtc पॉइंट्स टेबलमध्ये होणार शून्य फायदा, कारण?
Shubman Gill KL Rahul Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 04, 2026 | 11:41 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेची सांगता झाल्यानंतर आता टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमानंतर अफगाणिस्तान विरुद्ध मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 6 जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील सामना हा मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

अफगाणिस्तान आणि टीम इंडिया या दोन्ही संघांची कसोटी क्रिकेटमध्ये आमनेसामने येण्याची ही दुसरीच वेळ असणार आहे. टीम इंडियाने 2018 साली अफगाणिस्तावर अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात एका डावाने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया अफगाणिस्तानवर किती मोठा विजय मिळवणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे. मात्र टीम इंडियाला सामना जिंकल्यानंतरही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 च्या पॉइंट्स टेबलमध्ये काडीचाही फायदा होणार नाही. या निमित्ताने टीम इंडिया डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी आहे? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया कितव्या स्थानी

ताज्या आकडेवारीनुसार, टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 च्या पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी या साखळीच्या अंतिम फेरीत पोहचंण प्रचंड आव्हानात्मक ठरणार आहे. टीम इंडियाची टक्केवारी ही 48.15 अशी आहे. तर ऑस्ट्रेलिया पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ही 87.50 अशी आहे. डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये पॉइंट्सच्या टक्केवारीनुसार स्थान निश्चित होतं.

न्यूझीलंड क्रिकेट टीम पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या आणि गतविजेता दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानी आहे. श्रीलंका चौथ्या क्रमांकावर आहे. बांग्लादेश पाचव्या स्थानी आहे. तर इंग्लंड, पाकिस्तान आणि वेस्टइंडिज तिन्ही संघ पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानी आहेत.

भारताला विजयानंतर पॉइंट्स का मिळणार नाही? जाणून घ्या कारण

दरम्यान अफगाणिस्तान विरुद्ध विजयी झाल्यानंतरही टीम इंडियाला मिळणारे गुण हे डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये जोडले जाणार नाहीत. त्याचं कारणही तसंच आहे. अफगाणिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 साखळीचा भाग नाही. या साखळीत एकूण 9 संघ सहभागी आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...