IND vs AFG ODI Series : भारत-अफगाणिस्तान वनडे सीरिजसाठी टीममध्ये खेळाडूचा अचानक समावेश, कोण आहे तो?

India vs Afghanistan Odi Series 2026 : टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यीतल 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार 13 जूनपासून रंगणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तान संघात युवा गोलंदाजाचा समावेश करणयात आला आहे. जाणून घ्या.

IND vs AFG ODI Series : भारत-अफगाणिस्तान वनडे सीरिजसाठी टीममध्ये खेळाडूचा अचानक समावेश, कोण आहे तो?
Mohammad Saleem India vs Afghanistan Odi Series 2026
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 11, 2026 | 1:19 PM

भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानवर एकमेव कसोटी सामन्यात डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतीय क्रिकेट संघाचा हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला. त्यानंतर आता भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. उभयसंघात द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळवण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. या मालिकेला 13 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी अफगाणिस्तानच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघात एकदिवसीय मालिकेसाठी खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोशिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघात 1 बदल केला आहे. आपल्या बॉलिंगची ताकद वाढवण्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद सलीम याचा समावेश केला आहे.

अफगाणिस्तानला दुखापतीमुळे टेन्शन

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा सध्या दुखापतीसह संघर्ष सुरु आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मोहम्मद सलीम याचा संघात समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद सलीम याच्यात ताशी 140 किमी वेगाने बॉलिंग करण्याची क्षमता आहे. सलीमने लिस्ट ए क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान ए टीमसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

27 ओव्हर आणि 6 विकेट्स

मोहम्मद सलीम याने टीम इंडिया विरूद्धच्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. सलीमने 27 ओव्हरमध्ये 6 विकेट्स मिळवल्या होत्या. सलीमने ध्रुव जुरेल, कॅप्टन शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन या फलंदाजांना आऊट केलं होतं.

दरम्यान सलीमला वनडे क्रिकेटमध्ये काही खास करता आलेलं नाही. वसीम वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोन्ही सामने बांग्लादेश विरुद्ध खेळला आहे. मात्र त्याला एकही विकेट मिळवता
आलेली नाही.

सलीमने 2023 साली बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं होतं. सलीमला 2 सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. मात्र सलीमला विकेटचं खातं उघडता आलं नाही. आता सलीम भारतात खेळणार आहे.

लिस्ट ए कारकीर्द

दरम्यान सलीमने लिस्ट ए क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. सलीमने लिस्ट ए क्रिकेटमधील 36 सामन्यांमध्ये 61 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे सलीम टीम इंडियासमोर कशी बॉलिंग करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us