AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : कसोटी सामन्यासाठी आकिब नबीचा टीम इंडियात समावेश, प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार?

India vs Afghanistan Only Test 2026 : टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला अवघे काही तास बाकी आहेत. अशात भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आकीब नबी याला राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. जाणून घ्या.

IND vs AFG : कसोटी सामन्यासाठी आकिब नबीचा टीम इंडियात समावेश, प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार?
Aqib Nabi CricketImage Credit source: PTI
| Updated on: Jun 02, 2026 | 7:00 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेनंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या अफगाणिस्तान विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्याची प्रतिक्षा आहे. अफगाणिस्तान क्रिकेट टीम या कसोटी सामन्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर उभयंसघात 3 सामन्यांच्या एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांकडून या 4 सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. एकमेव कसोटी सामना हा 6 जूनपासून न्यू चंडीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.

निवड समितीने आकिब नबी याचा एकमेव कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात बॅकअप म्हणून समावेश केला आहे. निवड समितीकडून कायम खबरदारी म्हणून मालिकांसह मोठ्या स्पर्धेसाठी बॅकअप खेळाडूंना संधी दिली जाते. दुखापतीमुळे मुख्य संघातील खेळाडूला बाहेर व्हावं लागल्यास बॅकअप म्हणून समावेश करण्यात आलेल्या क्रिकेटरला गरजेनुसार संधी देण्यात येते. ऐनवेळेस गैरसोय आणि गडबड होऊ नये या हेतूने बॅकअप खेळाडूंना संधी दिली जाते. त्यानुसार आकीबचा बॅकअप म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आकीब आता टीम इंडियातील खेळाडूंना नेट्समध्ये बॉलिंग करताना दिसणार आहे.

आकीब नबीची उल्लेखनीय कामगिरी

आकीबला देशातंर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरीनंतरही भारतीय संघात संधी न दिल्याने क्रिकेट चाहत्यांसह माजी खेळाडूंकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. तर गुरनूर ब्रार, मानव सुथार आणि हर्ष दुबे या गोलंदाजांना कसोटी संघात संधी दिल्याने या संतापात आणखी भर पडली. आकीबला देशांतर्गत क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीनंतरही संधी न मिळाल्याने माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी संताप व्यक्त केला होता. देशांतर्गत क्रिकेट बंद करायला हवं, अशी संतापजनक प्रतिक्रिया वेंगसरकर यांनी दिली होती. त्यानंतर अखेर बॅकअप म्हणून आकीबचा समावेश करण्यात आला आहे. आकीबने गेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक 60 विकेट्स घेऊन जम्मू-काश्मीरला चॅम्पियन करण्यात बहुमूल्य योगदान दिलं होतं.

आकीबची देशांतर्गत कारकीर्द

दरम्यान आकीबने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बॉलिंगसह बॅटिंगनेही जबरदस्त अशी कामगिरी करुन दाखवली आहे. आकीबने 41 सामन्यांत 156 विकेट्स घेतल्यात. तसेच 2 अर्धशतकंही झळकावली आहेत

अफगाणिस्तान विरूद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुतार, ऋषभ पंत, देवदत्त पडीक्कल, नितीश कुमार रेड्डी, गुरनूर बरार, ध्रुव जुरेल आणि हर्ष दुबे.

Follow Us
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी गर्दी
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
मोठी बातमी! सुप्रिया सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे फक्त एक पद...
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंच्या आमदाराची हजेरी, चर्चांना उधाण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा....
Viral Video | धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार