AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराट कोहलीचं ठरलं, 9 जूनपासून काय करणार? मोठी अपडेट समोर

India vs Afghanistan 2026 : टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा थरार 13 जूनपासून रंगणार आहे. त्याआधी विराट 9 जूनपासून एक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

Virat Kohli : विराट कोहलीचं ठरलं, 9 जूनपासून काय करणार? मोठी अपडेट समोर
Virat Kohli Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 03, 2026 | 7:55 PM
Share

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सला पराभूत करुन सलग आणि एकूण दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. आता त्यानंतर विराट कोहली आणि टीम इंडिया खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी उत्सूक आहेत. भारतीय संघ मुल्लानपूरमध्ये 6 जूनपासून अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना या मालिकेआधी सरावासाठी बोलावण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांन 9 जून रोजी न्यू चंडीगडमध्ये बोलवण्यात आलं आहे. टीम इंडिया 9 ते 11 जून दरम्यान सराव करणार आहे. त्यानंतर टीम इंडिया धर्मशालेच्या दिशेने रवाना होणार आहे.

टीम इंडियाचं मिशन वनडे सीरिज

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 6 ते 10 जून दरम्यान कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या दरम्यान वनडे टीम इंडिया 9 जूनपासून सरावाला सुरुवात करणार आहे. जोरदार सराव व्हावा यासाठी सपोर्ट स्टाफने योजना आखली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ट आणि वनडे या दोन्ही टीममधील खेळाडूंसाठी फॉर्मेटनुसार प्लान करण्यात आला आहे.

जून महिना उजाडल्यानंतरही सूर्यनारायणाचा प्रकोप कायम आहे. न्यू चंडीगडमधील तापमान सपोर्ट स्फाटसाठी सर्वात मोठं आव्हान आहे. न्यू चंडीगडमधील तापमान हे 40 डिग्री पेक्षा अधिक आहे. अशा स्थितीत बॉलिंग करणं गोलंदाजांसाठी फार अवघड आहे. त्यामुळे टीम इंडियात 5 जणांचा नेट बॉलर म्हणून समावेश करण्यात आला आहे. या 5 नेट गोलंदाजांमध्ये मयंक यादव, शिवांग कुमार, सारांश जैन, जिशान अन्सारी आणि आकीब नबी यांचा समावेश आहे.

रोहित-विराटकडे चाहत्यांचं लक्ष

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा पूर्णपणे फिट नाहीय. त्यामुळे रोहित सध्या बंगळुरुतील एनसीएमध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला विराट कोहली वनडे क्रिकेटसाठी सज्ज आहे.

विराटने नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आरसीबीसाठी 16 डावांत एकूण 675 धावा केल्या. त्यामुळे आता विराट वनडे सीरिजमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारत-अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 13 जून, धर्मशाला

दुसरा सामना, 17 जून, लखनौ

तिसरा सामना, 20 जून, चेन्नई

अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, प्रिंस यादव, गुरनूर ब्रार,कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि हर्ष दुबे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...