AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS | वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाला तगडा झटका, मॅचविनर खेळाडू ‘आऊट’

india vs australia icc world cup 2023 | टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी खूप मोठा आणि 440 व्होल्ट्सचा झटका लागला आहे. टीम इंडियाचा स्टार बॅट्समन हा पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे.

IND vs AUS | वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाला तगडा झटका, मॅचविनर खेळाडू 'आऊट'
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Oct 08, 2023 | 2:40 PM
Share

चेन्नई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आपला सलामीचा सामना खेळणार आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे कांगारुंची धुरा आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे. मात्र या पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू हा आजारपणामुळे बाहेर झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

टीम इंडियाचा आघाडीचा आणि मॅचविनर फलंदाज शुबमन गिल हा दुखापतीमुळे नाही, तर आजारपणामुळे बाहेर झालाय. शुबमन गिल याला पहिल्या सामन्याच्या काही दिवसांआधी डेंग्युची लागण झाली. या डेंग्युने शुबमन गिल याची विकेट काढली. आता शुबमन गिल पहिल्या सामन्यात नसल्याने त्याच्या जागी विकेटकीपर बॅट्समन असलेल्या डावखुऱ्या ईशान किश याला संधी दिली आहे. ईशान किशन रोहित शर्मा याच्यासोबत ओपनिंग करणार आहे. यामुळे टीम इंडियाची लेफ्ट राईड कॉम्बिनेशन होईल.

शुबमन कधीपर्यंत फिट होणार?

दरम्यान टीम इंडियाचा आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील दुसरा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध आहे. तर तिसरा सामना हा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा सामना आहे. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी शनिवारी पाकिस्तान विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. शुबमनने या स्टेडियममध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. अनेक रेकॉर्ड्स शुबमनने इथे केले आहेत. त्यामुळे आता शुबमन कधीपर्यंत डेंग्युवर मात करत कमबॅक करतो, याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, अ‍ॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

Follow Us
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
Congress : महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…