चीटर म्हणून हिणवल्यामुळे स्टीव्ह स्मिथ दुःखी, म्हणाला…

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सोमवारी संपला. हा सामना ड्रॉ झाला असला तरी या सामन्याची चर्चा अजून काही दिवस सुरु राहील.

चीटर म्हणून हिणवल्यामुळे स्टीव्ह स्मिथ दुःखी, म्हणाला...
स्टिव्ह स्मिथ
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 10:28 AM

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) यांच्यातील तिसरा कसोटी सामना सोमवारी संपला. हा सामना ड्रॉ झाला असला तरी या सामन्याची चर्चा अजून काही दिवस सुरु राहील. या सामन्याद्वारे ऋषभ पंत आणि रोहित शर्माने केलेलं कमबॅक, दुखापतग्रस्त हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन या दोघांनी सामना वाचवण्यासाठी तब्बल 42 षटकं केलेली चिवट फलंदाजी, भारतीय गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी, ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहवर केलेली वर्णद्वेषी टीका या सगळ्यांची पुढील अनेक दिवस चर्चा होईल. यासोबतच ऑस्ट्रिलियाचा खेळाडू स्टिव्ह स्मिथने खेळलेला डर्टी गेमही अनेकांच्या लक्षात राहणार आहे. (India vs Australia: Steve Smith erases Rishabh Pant’s batting-guard marks)

पाचव्या दिवसाचा खेळ सुरु असताना टीम इंडियाने सकाळच्या सत्रात 102 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. तिसरी विकेट ही भरवशाचा फलंदाज आणि कर्णधार अजिंक्य रहाणेची होती. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून निसटला, असे बोलले जाऊ लागले होते. परंतु रहाणे बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 148 धावांची शानदार भागीदारी केली. ही भागिदारी कसोटीत चौथ्या डावात चौथ्या विकेटसाठी टीम इंडियाकडून सर्वाधिक धावांची भागीदारी ठरली. सुरुवातीला सावध सुरुवात करणाऱ्या ऋषभ पंतने खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला.

स्मिथचा ‘डर्टी गेम’?

सुरुवातीला 36 चेंडूत 6 धावा करणाऱ्या पंतने ऋषभ पंतने लंचपर्यंत 90 चेंडूत 73 धावा फटकावल्या होत्या. लंचपर्यंत भारताने तीन गड्यांच्या बदल्यात 206 धावा फटकावल्या होत्या. लंचनंतर पंतसह पुजारानेही फटकेबाजी सुरु केली. त्यामुळे पंत-पुजाराची जोडी जोडी हा सामना ऑस्ट्रेलियाच्या हातून हिरावणार असे वाटू लागले होते. ऑस्ट्रेलियन खेळाडूदेखील तणावात दिसत होते. त्यामुळे ऋषभ पंतला बाद करण्यासाठी संपूर्ण ऑस्ट्रेलियन टीम झटत होती. त्याचवेळी स्टिव्ह स्मिथने त्याच्या मूळ अवतारात परत येत ‘डर्टी गेम’ खेळण्याचा प्रयत्न केला. पंतचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न स्मिथ करु लागला.

दुपारच्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये स्मिथ खेळपट्टीवर गेला आणि त्याने हळूच कोणाचंही लक्ष जाणार नाही याची काळजी घेत खेळपट्टीवरील फलंदाजाने केलेलं बॅटिंग गार्ड मार्क (batting-guard mark) मिटवण्याचा प्रयत्न केला. त्याने खेळपट्टीवर पाय घासून ते मार्किंग मिटवलं. परंतु स्मिथचा डर्टी गेम त्याच्या उपयोगी पडला नाही. कारण ड्रिंक्स ब्रेकनंतर पंत जेव्हा खेळपट्टीवर आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याने केलेलं मार्किंग मुजलं आहे. तेव्हा त्याने पंचांशी बातचित करुन पुन्हा मार्क सेट केला आणि पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर आक्रमण केलं.

व्हिडीओ व्हायरल

स्मिथने केलेल्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे. त्यामुळे सर्वजण त्याला ट्रोल करु लागले आहेत. टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागनेही याचा व्हिडीओ ट्विट करत स्मिथला झापलं आहे. या व्हिडीओत स्मिथचा चेहरा दिसत नसला तरी तो त्याचं काम उरकून निघून जात असताना त्याच्या जर्सीवरील 49 हा नंबर स्पष्ट दिसतोय. ऑस्ट्रेलियन संघात या नंबरची जर्सी घालून स्मिथ मैदानात उतरतो.

भारताच्या शानदार फलंदाजीपेक्षा माझीच चर्चा जास्त : स्मिथ

स्मिथने केलेल्या या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्याच्यावर सोशल मीडियासह सर्वच माध्यमांवरुन टीका सुरु आहे. दरम्यान याप्रकरणी स्मिथने त्याची बाजू मांडली आहे. स्मिथने त्याच्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले आहे. स्मिथ म्हणाला की, लोकांनी या प्रकरणावरुन माझ्यावर ज्या पद्धतीने टीका केली आहे, त्याने मी नाराज आणि निराश झालो आहे. मी प्रत्येक सामन्यात शॅडो बॅटिंग करतो. केवळ आम्ही कुठे गोलंदाजी करतोय, यासाठी मी तसे करतो. फलंदाज कसं खेळतोय याचा अंदाज घेऊन मी खेळपट्टीवर सेंटर मार्क करतो. सिडनी टेस्टमध्येही मी तेच करत होतो. परंतु काही लोकांनी खूपच चुकीच्या पद्धतीने ही गोष्ट मांडली. या सामन्यात भारताने केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीपेक्षा माझीच जास्त चर्चा सुरु आहे. (Ind vs Aus : Steve Smith denies scuffing Rishabh Pants Gaurd Mark)

कर्णधार टीम पेनकडूनही समर्थन

दरम्यान, याप्रकरणी स्मिथपूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेननेदेखील स्मिथचं समर्थन केलं आहे. पेन म्हणाला की, स्मिथवर होत असलेल्या टीकेमुळे तो खूपच निराश आहे. तो खेळपट्टीवर जे काही करत होता ती गोष्ट खूपच चुकीच्या पद्धतीने मांडली गेली आहे, त्यामुळे तो दुःखी झाला आहे. जर तुम्ही स्मिथला यापूर्वी कसोटी क्रिकेट खेळताना पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की तो प्रत्येक सामन्यात असं करतो. तो दिवसातून पाच ते सहा वेळा असं करतो. मी त्याला शील्ड आणि इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येदेखील असं करताना पाहिलं आहे.

हेही वाचा

ना शमी, ना उमेश यादव, आता बुमराहचीही कमी, भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा कोण सांभाळणार?

ऋषभ पंतला बाद करण्यासाठी स्टिव्ह स्मिथचा ‘डर्टी गेम’, नेटीझन्सनी झापलं

डेव्हिड वार्नरची इन्स्टाग्राम पोस्ट, टीम इंडियासह मोहम्मद सिराजची मागितली माफी

सिडनी कसोटीचा निकाल वेगळा लागू शकला असता; हनुमा विहारीने व्यक्त केली खंत

(Ind vs Aus : Steve Smith denies scuffing Rishabh Pants Gaurd Mark)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.