IND vs AUS : दीड वर्ष बेंचवर बसवलेल्या खेळाडूला रोहित-राहुल जोडी पहिल्या टेस्टमध्ये देणार संधी

| Updated on: Feb 06, 2023 | 8:02 AM

IND vs AUS : येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये पहिली टेस्ट मॅच सुरु होईल. पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 काय असेल? त्याबद्दल उत्सुक्ता आहे. केएल राहुलसाठी टीम मॅनेजमेंट अजिबात अनुकूल नाहीय.

IND vs AUS : दीड वर्ष बेंचवर बसवलेल्या खेळाडूला रोहित-राहुल जोडी पहिल्या टेस्टमध्ये देणार संधी
Rohit sharma-Rahul dravid
Follow us on

IND vs AUS Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका सुरु व्हायला आता फक्त 3 दिवस उरले आहेत. येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये पहिली टेस्ट मॅच सुरु होईल. पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 काय असेल? त्याबद्दल उत्सुक्ता आहे. बॅटिंग आणि बॉलिंगशिवाय विकेटकीपिंग विभागात टीम इंडियासमोर समस्या आहे. कार अपघातात ऋषभ पंत जखमी झालाय. पुढचे काही महिने तो क्रिकेटच्या मैदानात दिसणार नाहीय. वनडे आणि T20 मध्ये केएल राहुलकडे विकेटकीपिंगची जबाबदारी दिली जाते. पण टेस्टमध्ये मात्र केएल राहुलला विकेटकीपिंग दिली जाणार नाही. कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड केएस भरतला टेस्ट डेब्युची संधी देऊ शकतात. मागच्या दीड वर्षांपासून भरत टीम इंडियासोबत आहे.

केएल राहुलचा विचार का होणार नाही?

केएस भरत मागच्या दीड वर्षांपासून टीम इंडियासोबत फिरतोय. हा खेळाडू बेंचवर बसून होता. त्याच्या संधीची प्रतिक्षा करत होता. आता ती वेळ आलीय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात केएस भरतला विकेटकीपिंगची जबाबदारी मिळू शकते. मागच्यावर्षी केएल राहुलला बरेच महिने दुखापतींचा सामना करावा लागला होता. हीच बाब ध्यानात घेऊन क्रिकेटच्या मोठ्या फॉर्मेटमध्ये केएल राहुलकडे विकेटकीपिंगची जबाबदारी दिली जाणार नाही.

BCCI पदाधिकाऱ्याने काय सांगितलं?

“केएल राहुलला मागच्या वर्षभरात बऱ्याचदा दुखापत झालीय. टेस्टमध्ये त्याला विकेटकीपिंगची जबाबदारी देणं योग्य ठरणार नाही. टेस्टमध्ये स्पेशलिस्ट विकेटकीपरची गरज भासते. केएस भरत आणि इशान किशन हे दोन स्पेशलिस्ट कीपर टीम इंडियाकडे आहेत. या दोघांपैकी कोणाला निवडायचं, ते टीम मॅनेजमेंटला ठरवायचय” असं वरिष्ठ बीसीसीआय पदाधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्ला सांगितलं.

केएल राहुलला टेस्टमध्ये विकेटकीपिंग करायला लावण्यात मोठा धोक आहे. पुन्हा त्याला दुखापत होऊ शकते. मोठ्या फॉर्मेटमध्ये स्पेशलिस्ट किपरची गरज आहे. भारतीय टीममध्ये इशान किशन आणि केएस भरत असे दोन खेळाडू आहेत, असं बीसीसीआय पदाधिकाऱ्याने सांगितलं.

टेस्टमध्ये संयमाची गरज

दीड वर्ष वाट पाहिल्यानंतर केएस भरत विकेटकीपिंगच्या जबाबदारीसाठी प्रमुख दावेदार आहे. केएल राहुलसाठी टीम मॅनेजमेंट अजिबात अनुकूल नाहीय. भरत आणि इशानमध्ये स्पर्धा आहे. इशान आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जातो. टेस्टमध्ये संयमाची गरज असते. इशान न्यूझीलंड विरुद्धच्या सीरीजमध्ये विशेष चमक दाखवू शकलेला नाही. तो फॉर्ममध्ये नाहीय. त्यामुळे केएस भरतला पहिली संधी मिळू शकते.