AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDvsAUS : कसोटी माालिकेतून टीम इंडियाच्या मॅचविनर खेळाडूची एन्ट्री

श्रीलंका आणि न्यूझीलंडला लोळवल्यानंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत भिडणार आहे. या मालिकेतून मॅचविनर खेळाडूचं कमबॅक झालं आहे.

INDvsAUS : कसोटी माालिकेतून टीम इंडियाच्या मॅचविनर खेळाडूची एन्ट्री
ravindra jadeja ind vs aus
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 05, 2023 | 10:25 PM
Share

नागपूर : टीम इंडियाने श्रीलंका आणि त्यानंतर न्यूझीलंडचा सुपडा साफ केला. वनडे सीरिजमध्ये रोहित शर्मा याने टीम इंडियाचं नेतृत्व केलं. तर हार्दिक पंड्याने टी 20 मालिकेत यशस्वीपणे सूत्रं सांभाळली. आता टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करणं टीम इंडियाचं लक्ष्य असणार आहे. कसोटी मालिकेतील पहिली मॅच नागपूर इथे 9 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. त्याआधी एका मॅचविनर खेळाडूची एन्ट्री झाली आहे.

आपण ज्या मॅचविनर खेळाडूबाबत बोलतोय, तो दुसरा तिसरा कुणी नसून ऑलराउंडर रवींद्र जडेजा आहे. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर जडेजा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतून कमबॅक करतोय. यासाठी तो स्वत:ला भाग्यवान समजोतय. करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेल्या दुखापतीनंतर टीम इंडियाची जर्सी घालण्याची संधी मिळतेय, त्यासाठी मी नशिबवान असल्याचं जडेजाच म्हणनं आहे. जडेजाला या दुखापतीमुळे गत टी 20 वर्ल्ड कपला मुकावं लागलं होतं.

जडेजाला टी 20 वर्ल्ड कप 2022 आधी गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे त्याला क्रिकेटपासून 5 महिने दूर रहावं लागलं होतं.

जडेजा काय म्हणाला?

“मी फार उत्साहित आहे. तसेच आनंदी ही आहे कारण 5 महिन्यांनी मला पुन्हा टीम इंडियाची जर्सी घालण्याची संधी मिळाली. इथपर्यंत पोहचेपर्यंत फार उतार-चढाव होते. तुम्ही 5 महिने क्रिकेट खेळत नाहीत, तर खेळाडू म्हणून ही बाब फार निराशाजनक आहे. मी लवकरात लवकर फिट कधी होतोय याची वाट पाहत होतो.”, अशी प्रतिक्रिया जडेजाने बीसीसीआय डॉट टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत दिली.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला