
पार्ल: दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) पहिले तीन विकेट 70 धावांच्या आत मिळवल्यानंतर चौथ्या विकेटसाठी भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागतोय. टेंबा बावुमा (Temba bavuma) कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवतोय. रासी वान डेर डुसे त्याला चांगली साथ देतोय. दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली आहे. बावुमा 80 धावांच्या पुढे खेळत आहे. रासी वान डेर डुसे 60 धावांचा टप्पा ओलांडला आहे. या दोघांच्या फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीमध्ये आहे.
दक्षिण आफ्रिकेने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारताकडून अश्विन आणि बुमराहने प्रत्येकी एक-एक विकेट घेतला आहे. युजवेंद्र चहलने त्याचा दहा षटकांचा कोटा पूर्ण करताना 53 धावा दिल्या. पण त्याला एकही विकेट मिळाला नाही. बुमराह, शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार या वेगवान गोलंदाजांना बावुमा-डुसेची जोडी दाद देत नाहीय.
बोलँड पार्क पीच रिपोर्ट
पार्लमधील बोलँड पार्कची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे या सामन्यात चांगली धावसंख्या पाहायला मिळू शकते. वेगवान आऊटफिल्ड आणि सीमारेषा छोटी असल्यामुळे मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. कसोटीमधील खेळपट्टया गोलंदाजांना मदत करणाऱ्या होत्या. याउलट वनडेमध्ये पीच फलंदाजीला अनुकूल आहे. वेगवान गोलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, तर ते फलंदाजांना अडचणीत आणू शकतात.