AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : भर मैदानात फुल्ल राडा, सुंदर-मिलर भिडले, काय झालं? पाहा व्हीडिओ

washington sundar and david miller Controversy Video : वॉशिंग्टन सुंदर आणि डेव्हिड मिलर या दोघांमध्ये सुपर 8 फेरीतील सामन्यादरम्यान काय झालं? पाहा व्हीडिओ.

IND vs SA : भर मैदानात फुल्ल राडा, सुंदर-मिलर भिडले, काय झालं? पाहा व्हीडिओ
David Miller and Washington Sundar ControversyImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 23, 2026 | 2:50 AM
Share

टीम इंडियाला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत व्हाव लागलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियासमोर 188 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने बॉलिंगनेही कमाल करत भारताला 18.5 ओव्हरमध्ये 111 रन्सवर ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 76 धावांनी विजय मिळवला आणि सलग पाचवा सामना जिंकला. भारताचा हा टी 20i क्रिकेटमधील धावांबाबत दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर आणि दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर या दोघांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. दोघांमध्ये नक्की काय झालं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

नक्की काय झालं?

सुंदर आणि मिलर यांच्यात सामन्यातील पहिल्या डावात हा राडा झाला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रम याने फलंदाजीचा निर्णय घेतला. वॉशिंग्टन सुंदर याने दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 14 वी ओव्हर टाकली. त्यानंतर नियमानुसार ड्रिंक्स ब्रेक झाला. या ब्रेकदरम्यान मिलर आणि सुंदरमध्ये शा‍ब्दिक युद्ध पाहायला मिळालं. मात्र वेळीच फिल्ड अंपायरने मध्यस्थी केली. त्यामुळे वादाला पूर्णविराम मिळाला.

पंच आणि सूर्याची यशस्वी मध्यस्थी

सुंदर आणि मिलर या दोघांमध्ये नक्की कशावरुन वाद झाला हे समजू शकलं नाहीय. मात्र मिलरला नक्कीच कोणत्या तरी मुद्द्यावरुन नाराज होता. त्यामुळे मिलर सुंदरला काही तरी बोलला. त्यामुळे सुंदरनेही वेळ न दवडता मिलरला त्याच भाषेत उत्तर दिलं. दोघांमध्ये वाकयुद्ध पेटलं. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच पंच आणि भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघांनी मध्यस्थी केली आणि विषय संपवला. मिलर आणि सुंदरच्या यांच्यातील वादाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वॉशिंग्टन सुंदर आणि डेव्हीड मिलरमध्ये राडा, पाहा

सुंदरला उपकर्णधार अक्षर पटेल याच्या जागी संधी

दरम्यान सुंदरला टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. मात्र सुंदरला या संधीचा काही फायदा घेता आला नाही. सुंदरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 ओव्हर बॉलिंग केली. सुंदरने या दरम्यान 17 धावा दिल्या. मात्र सुंदरला एकही विकेट मिळवता आली नाही.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?