
मुंबई: भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला टीम (South Africa Team) इंडियाच्या आधी कोरोना व्हायरसने (Corona virus) झटका दिला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एका टॉप फलंदाजाला कोरोनाची लागण झाली आहे. एडन मार्करमचा (Aiden Markram) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज पहिला T 20 सामना सुरु होण्याआधी एडन मार्करमला कोविडची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. टॉसच्यावेळी कॅप्टन टेंबा बावुमाने मार्करामला कोविडची लागण झाल्यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं सांगितलं. त्याला कधी कोविडची बाधा झाली? संघातील कुठल्या खेळाडूंना कोरोना झालाय, त्याची माहिती बावुमाने दिली नाही.
भारत-दक्षिण आफ्रिकेमधील पाच टी 20 सामन्यांची मालिका बायो बबलशिवाय खेळली जात आहे. बायो बबलची बंधन या मालिकेवर नाहीयत. 2020 मध्ये भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर पहिल्यांदाच भारत-दक्षिण आफ्रिका सीरीज बायो बबल शिवाय खेळली जात आहे. स्थिती सामान्य होत असल्याचं हे लक्षण आहे. मार्करम पॉझिटिव्ह आल्यामुळे बीसीसीआयची चिंता थोडी वाढली आहे.
From CSA: Aiden Markram tested positive for COVID-19 during the team’s last round of testing yesterday and has begun the quarantine protocol which was agreed by the two Boards before the commencement of the tour. #INDvSA
— Subhayan Chakraborty (@CricSubhayan) June 9, 2022
बुधवारी 8 जूनला शेवटच्या टेस्टिंगमध्ये मार्करमचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. टीमचा अन्य कुठल्याही सदस्य संक्रमित नाहीय. कोरोना संक्रमित झाल्यानंतर दोन्ही बोर्डामध्ये ठरल्यानुसार मार्करम क्वारंटाइन झाला आहे.
एडन मार्करमचं कोरोना पॉझिटव्ह होणं, दक्षिण आफ्रिकेसाठी एक मोठा झटका आहे. कारण नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2022 मध्ये त्याने सनरायजर्स हैदराबादकडून 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याशिवाय तो पार्ट टाइम ऑफस्पिन्र आहे.