Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, श्रीलंका विरुद्ध जबरदस्त शतक

| Updated on: Jan 07, 2023 | 8:55 PM

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अवघ्या 45 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलंय. सूर्याने या शतकी खेळीत 6 चौकार आणि 8 सिक्स ठोकले.

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, श्रीलंका विरुद्ध जबरदस्त शतक
Follow us on

राजकोट : सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी 20 सामन्यात (IND vs S, 3rd Odi) वादळी शतक ठोकलंय. सूर्याने अवघ्या 45 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलंय. सूर्याने या शतकी खेळीत 6 चौकार आणि 8 सिक्स ठोकले. सूर्याचं टी 20 कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलंय. यासह सूर्या टीम इंडियाकडून नववर्षात शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. तसेच सूर्या रोहित शर्मानंतर टी 20 मध्ये भारताकडून वेगवान शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. (ind vs sl 3rd t20i suryakumar yadav scored sensetional hundred against sri lanka at rajkot)

सूर्याने 51 बॉलमध्ये 9 खणखणीत सिक्स आणि 7 कडक चौकारांच्या मदतीने 219.61 च्या सुपर स्ट्राईक रेटने नॉट आऊट 112 रन्स ठोकल्या. टीम इंडियाकडून टी 20 मध्ये वेगवान शतकाचा विक्रम हा रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने 35 बॉलमध्ये 2017 साली श्रीलंका विरुद्धच हा कारनामा केला होता. तर आता सूर्याने 45 चेंडूत हा पराक्रम केलाय.

श्रीलंकेला 229 धावांचं विजयी आव्हान

सूर्याने केलेल्या नाबाद शतकी खेळीमुळे टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 229 धावांचं मजबूत लक्ष्य दिलंय. सूर्याच्या 112 धावांव्यतिरिक्त शुबमन गिलने 46 धावा केल्या. राहुल त्रिपाठीने वेगवान 35 रन्सचं योगदान दिलं. तर अक्षर पटेलने शेवटी 9 बॉलमध्ये 21 धावा कुटल्या. तर श्रीलंकेकडून दिलशान मधुशंकाने 2 विकेट्स घेतल्या. तर राजिथा, करुणारत्ने आणि हसरंगा या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी, अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दासुन शानका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, धनंजया डिसिल्वा, चरित असालंका, अविष्का फर्नांडो, वानिंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, महीष तीक्षणा, कासुन रजिता आणि दिलशान मधुशंका.