Mohammed Siraj : ‘मॅजिक मिया’कडून श्रीलंकेचा गरबा, एकाच ओव्हरमध्ये चार विकेट्स, पाहा Video

Mohammed Siraj Four Wickets in one over : भारताचा युवा खेळाडू मोहम्मद सिराज यान मॅजिकल स्पेल टाकत श्रीलंकेला धक्का दिला आहे. पठ्याने एकाच ओव्हरमध्ये चार विकेट्स घेतल्या. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Mohammed Siraj : मॅजिक मियाकडून श्रीलंकेचा गरबा, एकाच ओव्हरमध्ये चार विकेट्स, पाहा Video
| Updated on: Sep 17, 2023 | 5:02 PM

मुंबई : आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये भारत आणि श्रीलंकेचा सामना सुरू आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने कहर करून टाकला आहे. सिराजने एका ओव्हरमध्ये चार विकेट घेत श्रीलंकेला बॅकफूटला ढकललं आहे. मोहम्मद सिराजने त्यानंतरच्या ओव्हरमध्ये आणखी एक ओव्हरमध्ये विकेट घेत सिराजने अवघ्या 16 बॉलमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत.  सोशल मीडियासह जगभरात सिराज ट्रेंड करत आहे.

पाहा व्हिडीओ:-

 

मोहम्मद सिराज याने पहिली ओव्हर मेडन टाकली त्यानंतरच्या ओव्हरमध्ये पठ्ठ्याने चार विकेट्स घेतल्या. भारतासाठी मोहम्मद सिराज याने वन डे क्रिकेटमध्ये 50 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यासह सिराजने त्याच्या करिअरमधील बेस्ट प्रदर्शन केलं आहे. भारताकडून वन डे मध्ये क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये चार विकेट्स घेणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (Wk), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (Wk), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (C), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना