
धर्मशाळा येथे झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर (India vs Srilanka) शानदार विजय मिळवला. श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) भारताच्या विजयाचे हिरो ठरले. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 58 धावांची विजयी भागीदारी केली. श्रेयसच्या 44 चेंडूत नाबाद 74 धावा आणि रवींद्र जाडेजाच्या 18 चेंडूत नाबाद 45 धावांच्या बळावर भारताने श्रीलंकेवर सात विकेट राखून विजय मिळवला. भारताने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता उद्या होणारा तिसरा सामना फक्त औपचारिकता मात्र आहे.
भारताची प्लेइंग इलेवन: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह
भारतासमोर विजयासाठी 184 धावांचे लक्ष्य आहे. सलामीवीर पथुम निसांका (75) आणि कॅप्टन दासुन शानकाच्या (47) फलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने एवढी विशाल धावसंख्या उभारली
हर्षल पटेल महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या चार षटकात 52 धावा निघाल्या. श्रीलंकेने शेवटच्या चार षटकात 72 धावा चोपल्या.
श्रेयस अय्यर नाबाद 74 आणि रवींद्र जाडेजाच्या 45 तुफान फलंदाजीच्या बळावर भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेवर सात विकेट राखून शानदार विजय मिळवला. भारताने तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
2ND T20I. India Won by 7 Wicket(s) https://t.co/KhHvQG09BL #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) February 26, 2022
रवींद्र जाडेजाने श्रीलंकेची गोलंदाजी कुटून काढली आहे. 16 व्या षटकात भारताच्या 175 धावा झाल्या आहेत. विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे.
भारताची जबरदस्त फलंदाजी सुरु आहे. 15 षटकात भारताच्या तीन बाद 152 धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यर 69 आणि रवींद्र जाडेजाची 17 जोडी मैदानावर आहे. भारताला विजयासाठी 30 चेंडूत 32 धावांची आवश्यकता आहे.
श्रेयस अय्यरची तुफान फलंदाजी सुरु आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध सलग दुसरं शानदार अर्धशतक झळकवल आहे. श्रेयसने 34 चेंडूत 61 धावा केल्या आहेत.
Shreyas Iyer brings up his half-century in style.
This is his 5th in T20Is.
Live – https://t.co/KhHvQG09BL #INDvSL @Paytm pic.twitter.com/OBIEmpzwVK
— BCCI (@BCCI) February 26, 2022
भारताच्या नऊ षटकात दोन बाद 70 धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यरने प्रवीण जयाविक्रमाच्या एका ओव्हरमध्ये सलग दोन षटकार ठोकून 14 धावा वसूल केल्या. श्रेयस अय्यर 25 चेंडूत 43 धावा केल्या आहेत. यात पाच चौकार आणि दोन षटकार आहेत.
सहा षटकात भारताच्या दोन बाद 46 धावा झाल्या आहेत. इशान किशन 16 धावांवर आऊट झाला. लाहीरु कुमाराने त्याला शानकाकरवी झेलबाद केले. श्रेयस अय्यर 25 धावांवर खेळतोय. संजू सॅमसन त्याची साथ द्यायला मैदानात आला आहे.
रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला आहे. चामीराने त्याला क्लीन बोल्ड केले. पहिल्या षटकात भारताच्या एकबाद 9 धावा झाल्या आहेत. रोहित फक्त एक रन्स केला. इशान किशन सात धावांवर खेळतोय.
2ND T20I. WICKET! 0.6: Rohit Sharma 1(2) b Dushmantha Chameera, India 9/1 https://t.co/KhHvQG09BL #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) February 26, 2022
श्रीलंकेने भारताला विजयासाठी 184 धावांचे लक्ष्य दिले आहे. सलामीवीर पथुम निसांका (75) धावा आणि कॅप्टन दासुन शानकाच्या 19 चेंडूत नाबाद (47) धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने निधारीत 20 षटकात पाच बाद 183 धावा केल्या. शानकाने नाबाद 47 धावांच्या खेळीत दोन चौकार, पाच षटकार लगावले. शेवटच्या चार षटकात श्रीलंकेने 72 धावा केल्या. हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात 23 धावा काढल्या. तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात 52 धावा दिल्या.
2ND T20I. 19.6: Harshal Patel to Dasun Shanaka 6 runs, Sri Lanka 183/5 https://t.co/KhHvQGiiPT #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) February 26, 2022
श्रीलंकेच्या 19 षटकात चार बाद 160 झाल्या आहेत. पथुम निसांकाला (75) धावांवर भुवनेश्वर कुमारने पायचीत पकडलं. त्याने 53 चेंडूत 75 धावा केल्या. यात 11 चौकार होते. कर्णधार दासुन शानका जबरदस्त फलंदाजी करत आहे. त्याने 13 चेंडूत (29) धावा केल्या आहेत.
2ND T20I. WICKET! 18.6: Pathum Nissanka 75(53) lbw Bhuvneshwar Kumar, Sri Lanka 160/5 https://t.co/KhHvQG09BL #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) February 26, 2022
श्रीलंकेच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. पण त्यांच्या चार विकेट गेल्या आहेत. श्रीलंकेच्या 15 षटकात चार बाद 103 धावा झाल्या आहेत. दिनेश चंडीमलला बुमराहने रोहित शर्माकरवी झेलबाद केले.
2ND T20I. WICKET! 14.4: Dinesh Chandimal 9(10) ct Rohit Sharma b Jasprit Bumrah, Sri Lanka 102/4 https://t.co/KhHvQGiiPT #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) February 26, 2022
हर्षल पटेलने एका सुंदर स्लोअरवन चेंडूवर कामिल मिशाराला (1) फसवलं. त्याने कव्हरच्या दिशेने मारलेला फटक्यावर श्रेयस अय्यरने सुंदर झेल घेतला. तेरा षटकात श्रीलंकेच्या एक बाद 91 धावा झाल्या आहेत.
2ND T20I. 12.5: Bhuvneshwar Kumar to Pathum Nissanka 4 runs, Sri Lanka 91/3 https://t.co/KhHvQGiiPT #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) February 26, 2022
युजवेंद्र चहलने भारताला दुसरं यश मिळवून दिलं आहे. दहा षटकात श्रीलंकेच्या दोनबाद 71 धावा झाल्या आहेत. चरित असालंकाला युजवेंद्र चहलने अवघ्या दोन धावांवर पायचीत पकडलं.
Gunathilaka and Asalanka depart in quick succession.@imjadeja and @HarshalPatel23 with the wickets.
Live – https://t.co/KhHvQG09BL #INDvSL @Paytm pic.twitter.com/oZd8ob0U4H
— BCCI (@BCCI) February 26, 2022
रवींद्र जाडेजाची धुलाई करणारा दानुष्का गुणतिलका अखेर आऊट झाला आहे. 29 चेंडूत त्याने 38 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. जाडेजाने त्याला वेंकटेश अय्यरकरवी झेलबाद केले.
2ND T20I. WICKET! 8.4: Danushka Gunathilaka 38(29) ct Venkatesh Iyer b Ravindra Jadeja, Sri Lanka 67/1 https://t.co/KhHvQGiiPT #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) February 26, 2022
श्रीलंकेच्या आठ षटकात बिनबाद 51 धावा झाल्या आहेत. पथुम निसांका (25) आणि दानुष्का गुणतिलका (22) ही सलामीची जोडी खेळत आहे.
श्रीलंकेच्या सहा षटकात 32 धावा झाल्या आहेत. पथुम निसांका (14) आणि दानुष्का गुणतिलका (14) ही सलामीची जोडी मैदानात आहे.
पाच षटकात श्रीलंकेच्या बिनबाद 25 धावा झाल्या आहेत. पथुम निसांका (8) आणि दानुष्का गुणतिलका (13) ही सलामीची जोडी मैदानात आहे. पाचव षटकं हर्षल पटेलने टाकलं.
तीन षटकात श्रीलंकेच्या बिनबाद 13 धावा झाल्या आहेत. पथुम निसांका (2) आणि दानुष्का गुणतिलका (7) ही सलामीची जोडी मैदानात आहे. तिसरं षटक भुवनेश्वर कुमारने टाकलं
दोन षटकात श्रीलंकेच्या बिनबाद सात धावा झाल्या आहेत. पथुम निसांका (1) आणि दानुष्का गुणतिलका (2) ही सलामीची जोडी मैदानात आहे. दुसरं षटक जसप्रीत बुमराहने टाकलं.
पहिल्या षटकात श्रीलंकेच्या बिनाबाद 2 धावा झाल्या आहेत. पथुम निसांका आणि दानुष्का गुणतिलका ही सलामीची जोडी मैदानात आहे. पहिलं षटक भुवनेश्वर कुमारने टाकलं
दासुन शानका (कर्णधार), पथुम निसांका, कामिल मिशारा, चरित असालंका, दिनेश चांदीमल (विकेटकीपर), चामिका करुणारत्ने, दुष्मंता चमीरा, प्रवीण जयाविक्रमा, लाहिरू कुमारा, बुनुरा फर्नांडो आणि दानुष्का गुणतिलका.
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह
Captain @ImRo45 wins the toss and elects to bowl first in the 2nd T20I.
An unchanged Playing XI for #TeamIndia
Live – https://t.co/ImBxdhXjSc #INDvSL @Paytm pic.twitter.com/DdEebeL2rP
— BCCI (@BCCI) February 26, 2022