AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: कुलदीप यादवने टाकलेला मॅजिक बॉल पाहीला का? फलंदाजालाच कळलं नाही कसा आऊट झाला?

India vs West Indies, 1st Test: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्लेइंग 11 मध्ये कुलदीप यादवला स्थान मिळालं. 1 वर्षानंतर त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली. यावेळी त्याने दोन विकेट घेतल्या. त्यापैकी एक विकेट मॅजिक बॉलवर आली. त्याची आता चर्चा रंगली आहे.

Video:  कुलदीप यादवने टाकलेला मॅजिक बॉल पाहीला का? फलंदाजालाच कळलं नाही कसा आऊट झाला?
Video: कुलदीप यादवने टाकलेला मॅजिक बॉल पाहीला का? फलंदाजालाच कळलं नाही कसा आऊट झाला?Image Credit source: PTI
| Updated on: Oct 02, 2025 | 4:12 PM
Share

कुलदीप यादव हा भारतीय क्रिकेट संघातील आता विश्वासाचा फिरकीपटू ठरला आहे. जेव्हा विकेट मिळत नाही तेव्हा हमखास विकेट घेऊ शकतो अशी त्याची छबी तयार झाली आहे. कुलदीप यादवने आशिया कप स्पर्धेत आपल्या कर्तृत्वाने हे सिद्ध करून दाखवलं आहे. आता कुलदीप यादव वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आपल्या गोलंदाजीची करामत दाखवत आहे. यावेळी त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजांना गुंतवलं. यावेळी वेस्ट इंडिजच्या फॉर्मात असलेल्या शाई होपचा क्लिन बोल्ड केले. कुलदीप यादवने टाकलेल्या चेंडूचा शे होपकडे काहीच उत्तर नव्हतं. कुलदीप यादवने टाकलेल्या या चेंडूची तुलना आता शेन वॉर्नशी केली जात आहे. कुलदीप यादवने हा मॅजिक बॉल संघाच्या 24व्या षटकात टाकला. त्याने टाकलेल्या चेंडूची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

कर्णधार शुबमन गिल याने संघाचं 24वं षटक कुलदीप यादवकडे सोपवलं. या षटकाच्या दुसऱ्या चेंडू शाई होपला कळलाच नाही. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पडला आणि इतक्या वेगाने टर्न झाला की स्टंप घेऊन गेला. होपला वाटलं की तो सहज या चेंडूवर ड्राईव्ह करेल. पण तसं झालं नाही. त्याने बॅट तर फिरवली पण चेंडू स्टंप घेऊन गेला. कुलदीपच्या हा चेंडू पाहून शाई होप आवाक् झाला. त्याचा अवघ्या 26 धावांवर आटोपला.

कुलदीप यादवने 347 दिवसानंतर कसोटी क्रिकेटच्या प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवली आहे. .यापूर्वी इंग्लंड दौऱ्यातही टीम इंडियासोबत गेला होता. पण पाचही सामने त्याला बेंचवर बसून पाहावे लागले. पण कुलदीप यादव योग्य संधीच्या प्रतीक्षेत होता. आशिया कप स्पर्धेत त्याला संधीचं सोनं करण्यास मिळालं. त्याने या स्पर्धेत 17 विकेट घेतल्या आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीसाठी विचार करणं भाग पाडलं. वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात कुलदीप यादवे 6.1 षटक टाकत 25 धावा देत 2 गडी बाद केले.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?