AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4,4,4,6… वर्ल्ड कपसाठी ज्या खेळाडूला पंड्याचा बॅकअप म्हणून शोधला, पण त्याचाच कॅरेबियन फलंदाजांनी थेट कार्यक्रम केला

IND vs WI: ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

4,4,4,6... वर्ल्ड कपसाठी ज्या खेळाडूला पंड्याचा बॅकअप म्हणून शोधला, पण त्याचाच कॅरेबियन फलंदाजांनी थेट कार्यक्रम केला
| Updated on: Sep 27, 2026 | 5:59 PM
Share

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात नितीश कुमार रेड्डीची सुरुवात निराशाजनक झाल्याचे दिसून आले आहे. त्याने आपल्या पहिल्या आणि डावातील दुसऱ्या षटकात १८ धावा दिल्या. जस्टिन ग्रीव्ह्सने रेड्डीच्या सात चेंडूंच्या षटकात चार चौकार मारले. अशाप्रकारे रेड्डीच्या षटकात चार चौकार, एक अतिरिक्त धाव आणि एक धाव अशा एकूण १८ धावा दिल्या गेल्या. यानंतर त्याची चर्चा होत आहे.

नितीश कुमारने पहिल्याच चेंडूवर लेग बाय धाव दिली. कॅम्पबेलने स्ट्राईक जस्टिन ग्रीव्ह्सकडे सोपवली. दुसरा चेंडू नो बॉल होता. उत्तम कव्हर ड्राईव्हवर ग्रीव्ह्सने चौकार मारला. नंतर दुसरा चेंडूचा त्याने फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतला. मिड-विकेटवरून उंच फटका मारून चौकार मिळवला. तिसरा चेंडू पुढच्या पायावर फ्लिक शॉट पडला. यामुळे स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार गेला. चौथा चेंडू वेगवान लांबीचा होता. यावर पुढे सरसावत ग्रीव्ह्सने बचाव केला. तो निर्धाव राहिला.

पाचवा चेंडूवर ग्रीव्ह्सने मिड-ऑफच्या दिशेने अप्रतिम फटका मारत चौकार लगावला. नितीशने सहावा चेंडू यष्टीच्या रेषेवर टाकला. त्यावर धाव मिळाली नाही. नितीश रेड्डी हार्दिक पांड्याचा पर्यायी खेळाडू बनू शकेल का?, असा सवाल उपस्थित होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाच्या योजनांमध्ये नितीश रेड्डीचा सुरुवातीला समावेश नव्हता.

जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठी निवडलेल्या भारतीय टी-२० संघात त्याचा सुरुवातीला समावेश होता, परंतु नंतर त्याला आशियाई खेळांऐवजी एकदिवसीय मालिकेत खेळण्यास सांगितले गेले. कदाचित निवड समितीला हे माहीत होते की, दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या पुन्हा जखमी झाला आहे. त्याला बरे होण्यासाठी आणखी दोन ते तीन महिने लागू शकतात. त्यामुळे विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून संघ व्यवस्थापन एक पर्यायी अष्टपैलू खेळाडू तयार करण्याचा विचार करत आहे.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...