AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हैदराबादच्या नव्या खेळपट्टीवर वेस्ट इंडिजचा धुमाकूळ! शाई होपचं वादळी शतक, भारतासमोर किती धावांचं आव्हान?

India vs West Indies 4th T20I: चौथ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने 20 षटकांत 247 धावा केल्या आहेत. भारतासमोर 248 धावांचे आव्हान आहे. शाई होपने पुन्हा एकदा शतक केले आहे.

हैदराबादच्या नव्या खेळपट्टीवर वेस्ट इंडिजचा धुमाकूळ! शाई होपचं वादळी शतक, भारतासमोर किती धावांचं आव्हान?
| Updated on: Oct 14, 2026 | 9:12 PM
Share

हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा टी-20 सामना खेळला जात आहे. मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे वेस्ट इंडिजने भारतासमोर 246 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यात शाई होपचे शतक महत्त्वाचे ठरले आहे.

शाई होपने 50 चेंडूंत धडाकेबाज शतक झळकावले. जे या मालिकेतील त्याचे दुसरे शतक ठरले आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप या सामन्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. त्याने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत अवघ्या 50 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. शाई होपच्या कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. त्याने आता वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय शतके करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

भारताला विजयासाठी २४८ धावांची गरज आहे. सध्या या फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग 209 धावांचा आहे. त्यामुळे भारताला जिंकण्यासाठी एक नवीन विक्रम प्रस्थापित करावा लागणार आहे. कर्णधार शाई होपने वेस्ट इंडिजसाठी आघाडी घेतली आणि चार चौकार व नऊ षटकारांसह 50 चेंडूंमध्ये नाबाद 102 धावा केल्या. त्याला साथ देताना शेर्फेन रदरफोर्डने चार चौकार आणि तीन षटकारांसह 26 चेंडूंमध्ये नाबाद 49 धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 91 धावांची (43 चेंडू) भागीदारी केली.

भारताकडून अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. भारतीय गोलंदाज खूप महागडे ठरले. मयंकने 4 षटकांत 52 धावा दिल्या, अर्शदीपने 4 षटकांत 52 धावा दिल्या, अक्षरने 4 षटकांत 45 धावा दिल्या, नितीश रेड्डीने 3 षटकांत 39 धावा दिल्या आणि प्रिन्स यादवने 4 षटकांत 36 धावा दिल्या आहेत.

शाई होपने तीन शतकांसह टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणारा वेस्ट इंडिजचा फलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. त्याने ख्रिस गेलचा (2) विक्रम मोडला आहे.होप टी 20 आंतरराष्ट्रीय मालिकेत दोन शतके झळकावणारा पहिला कर्णधार ठरला. त्याने रांची येथे झालेल्या दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद 102 धावा देखील केल्या. टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत दोन शतके झळकावणारा शाई होप हा पूर्ण सदस्य राष्ट्रांमधील केवळ चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी फिल सॉल्ट, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी हा पराक्रम केला आहे. भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत दोन शतके झळकावणारा होप हा पहिला फलंदाज ठरला आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप