IND vs ZIM, Super 8 : अभिषेकला फ्लॉप होऊनही संधी, संजूचा समावेश, रिंकूचा बळी, झिंबाब्वे विरुद्ध भारताची बॅटिंग

India vs Zimbabwe Super 8 Toss and Playing 11 : टीम इंडिया आणि झिंबाब्वे दोन्ही संघांनी करो या मरो सामन्यात बदल केले आहेत. जाणून घ्या कुणाला संधी मिळाली आहे.

IND vs ZIM, Super 8 : अभिषेकला फ्लॉप होऊनही संधी, संजूचा समावेश, रिंकूचा बळी, झिंबाब्वे विरुद्ध भारताची बॅटिंग
Suryakumar Yadav and Sikandar Raza IND vs ZIM Toss
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Feb 26, 2026 | 7:58 PM

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 48 व्या सामन्यात सुपर 8 फेरीत ए ग्रुपमधील 2 पराजित संघ आमनेसामने आहेत. टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात हा सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी सुपर 8 फेरीतील आपला पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी एकमेकांविरूद्धचा सामना सेमी फायनलच्या हिशोबाने करो या मरो असा आहे. अशात आता या आर या पारच्या लढाईत कोण मैदान मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारत विरुद्ध झिंबाब्वे सुपर 8 फेरीतील हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. झिंबाब्वेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार सिकंदर रझा याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. तसेच आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती, असं म्हणत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने या निर्णयासह आनंद व्यक्त केला. त्यामुळे आता टीम इंडिया चेपॉकच्या स्टेडियममध्ये किती धावा करते हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

टीम इंडियात बदल, रिंकु सिंहचा बळी

झिंबाब्वे विरूद्धच्या सामन्यात भारतीय संघात 2 बदल केले गेले आहेत. सलग 3 वेळा झिरोवर आऊट झालेल्या अभिषेक शर्मा याच्यावर टीम मॅनेजमेंटने पु्न्हा एकदा विश्वास दाखवला आहे. तर संजू सॅमसन याला संधी देण्यात आली आहे. संजूसाठी रिंकु सिंह याचा बळी देण्यात आला आहे. तर वॉशिंग्टन सुंदर याच्या जागी उपकर्णधार अक्षर पटेल याचं पुनरागमन झालं आहे. तर झिंबाब्वेकडून 1 बदल करण्यात आला आहे. ग्रेमी क्रिमर याच्या जागी टिनोटेंडा मापोसा याला संधी मिळाली आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

झिंबाब्वे प्लेइंग ईलेव्हन : तादिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), ब्रायन बेनेट, डायन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा (कॅप्टन), टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, टिनोटेंडा मापोसा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि रिचर्ड नागरावा.

Follow Us