IND vs ZIM : दोन षटकार मारत यशस्वीने रोहित-इशानचा विक्रमाशी केली बरोबरी, सेहवागचा रेकॉर्ड अबाधित

पाच सामन्यांची टी20 मालिका भारताने 4-1 ने जिंकली. पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने टीका झाली होती. मात्र उर्वरित चार सामन्यात टीम इंडियाने साजेशी कामगिरी करून जबरदस्त कमबॅक केलं. या सामन्यात यशस्वी जयस्वालने पहिल्याच षटकात दोन षटकार मारले आणि रोहित-इशानच्या विक्रमाची बरोबरी केली.

IND vs ZIM : दोन षटकार मारत यशस्वीने रोहित-इशानचा विक्रमाशी केली बरोबरी, सेहवागचा रेकॉर्ड अबाधित
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 14, 2024 | 7:55 PM

झिम्बाब्वेविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका भारताने जिंकली. शेवटच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला 42 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झिम्बाब्वेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती. मात्र आघाडीची फलंदाज झटपट बाद आणि संघावरील दडपण वाढलं. मात्र संजू सॅमसन आणि रियान परागने डाव सावरला. तसेच 20 षटकात 6 गडी गमवून 167 धावांपर्यंत मजल मारली. झिम्बाब्वेने धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली केली. मात्र नंतर डाव अडखळला आणि पुढचं गणित फिस्कटलं. या सामन्यात यशस्वी जयस्वाल तसं काही खास करू शकला नाही. पण संघाला आक्रमक सुरुवात करून देण्यात यश मिळवलं. पहिल्याच षटकात दोन उत्तुंग षटकार मारले. पण पाचव्या चेंडूवर प्रयत्न फसला आणि त्रिफळा उडला. असं असलं तरी यशस्वी जयस्वालने एका विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहित शर्मा आणि इशान किशनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तर विरेंद्र सेहवागचा विक्रम मात्र अबाधित आहे.

यशस्वी जयस्वालने सिकंदर रझाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून डावाला सुरुवात केली. सिकंदर रझाचा हा चेंडू नो बॉल होता. त्यामुळे पुढचा चेंडू फ्री हीट मिळाला. मग काय त्या संधीचं सोनं करून यशस्वी जयस्वालने दुसरा षटकार मारला. पण सिकंदर रझाच्या पाचव्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला आणि तंबूत परतला. पण दोन षटकारांसह यशस्वी रोहित शर्मा आणि इशान किशनच्या क्लबमध्ये सामिल झाला आहेय. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात षटकार मारणारा चौथा फलंदाज ठरला. यात वीरेंद्र सेहवाग आघाडीवर आहे. त्याने 2009 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 3 षटकार मारले होते.

रोहित शर्माने 2018 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन, तर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन षटकार मारले होते. तर इशान किशनने 2022 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2 षटकार मारले होते. आता यशस्वी जयस्वालने झिम्बाब्वेविरुद्ध दोन षटकार मारले आहेत. दरम्यान, या महिन्याच्या शेवटी टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. आता या संघातील कोणा कोणाला स्थान मिळतं आणि कोणाला डावललं जातं याची उत्सुकता आहे. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत कमबॅकसाठी सज्ज आहेत. त्यामुळे निवड समिती आणि गौतम गंभीरची कसोटी लागणार आहे.