India tour of Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावर पारस महांब्रे प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळण्याची चिन्हं, संपूर्ण दौरा कसा असेल?

| Updated on: May 11, 2021 | 12:53 PM

येत्या जुलै महिन्यात टीम इंडिया श्रीलंका (India tour of Sri Lanka in July)  दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्याचवेळी भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी (World Test Championship) दाखल झालेला असेल.

India tour of Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावर पारस महांब्रे प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळण्याची चिन्हं, संपूर्ण दौरा कसा असेल?
Team India
Follow us on

मुंबई : येत्या जुलै महिन्यात टीम इंडिया श्रीलंका (India tour of Sri Lanka in July)  दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्याचवेळी भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी (World Test Championship) दाखल झालेला असेल. त्यामुळे विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah ) यासारख्या हुकमी खेळाडूंच्या अनुपस्थितीत, भारताला दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर पाठवावा लागणार आहे. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी तसे संकेत दिले आहेत.

श्रीलंका दौऱ्यात तीन वन डे आणि तीन टी ट्वेण्टी सामने खेळले जाणार आहेत. यासाठी 5 जुलैपर्यंत भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर दाखल होईल. (India tour of Sri Lanka in July scheduled ODI and T20 matches team India)

श्रीलंका दौऱ्यावर कोणाला संधी? 

भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाण्यासंबंदीची माहिती देऊन बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने सगळ्यांनाच कोड्यात टाकलं. मर्यादित ओव्हर्सची एक्सपर्ट टीम श्रीलंकेला जाणार आहे, असं सौरव गांगुली म्हणाला. दुसरीकडे टी ट्वेन्टी वर्ल्ड देखील तोंडावर आलेला आहे. अशावेळी संघातील इतर युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांचा परफॉर्मन्स कसा होतोय, यावरही टी ट्वेन्टी वर्ल्डकपचा अंतिम संघ अवलंबून असेल.

श्रीलंका दौऱ्यात सर्व सामने एकाच मैदानावर होतील. श्रीलंकेतील कोलंबोमधल्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर सामने खेळवण्याची योजना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आखली आहे.

प्रशिक्षक म्हणून पारस महांब्रे

स्टार स्पोर्ट्सच्या मते, श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून पारस महांब्रे (Paras Mhambrey) जाऊ शकतात. कारण भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सर्वात महत्त्वाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी इंग्लंड दौऱ्यावर असतील. दरम्यान, या दौऱ्यावर माजी कसोटीपटू राहुल द्रविडही टीम इंडियासोबत जाऊ शकतो. मात्र BCCI ने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

कोण आहेत पारस महांब्रे

  • पारस महांब्रे हे माजी क्रिकेटपटू आहेत. मूळचे मुंबईकर असलेले 48 लवर्षीय पारस महांब्रे हे भारताकडून 2 कसोटी आणि 3 वन डे सामने खेळले आहेत.
  • पारस महांब्रे यांनी लेव्हल 3 प्रशिक्षक म्हणून नॅशनल क्रिकेट अकादमीमधून प्रशिक्षण घेतलं आहे.
  • स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी बंगाल, महाराष्ट्र, बडोदा आणि विदर्भचं प्रशिक्षकपद सांभाळलं होतं.
  • याशिवाय आयपीएलमध्ये ते चार वर्ष मुंबई इंडियन्सचे सहाय्यक प्रशिक्षक होते.
  •  सध्या ते इंडिया ए आणि अंडर 19 भारतीय संघाचे बोलिंग कोच म्हणून काम पाहात आहेत

भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दौऱ्याची सुरुवात वन डे मालिकेने होणार आहे. 13, 16 आणि 19 जुलैला वन डे, तर 22, 24 आणि 27 जुलैला टी ट्वेण्टी मालिका खेळवण्यात येतील.

सलावीमीर कोण…?

संघाचा नियमित सलामीवीर शिखर धवन या दौर्‍यावर असेल आणि बहुधा कर्णधारही असेल. पृथ्वी शॉ त्याच्याबरोबर श्रीलंका दौऱ्यावर सलामीवीर म्हणून जाणार आहे, जेणेकरून पृथ्वी आपला फॉर्म टिकवून ठेवू शकेल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास तयार असेल. याशिवाय कर्नाटकचा युवा फलंदाज देवदत्त पद्धिकल आणि महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांना सलामीवीर म्हणून संघात संधी मिळू शकते.

मिडल ऑर्डर कोण सांभाळणार?

सूर्यकुमार यादव, ईशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, संजू सॅमसन असे पर्याय भारतीय संघासमोर आहेत. यातील कुणाला अंतिम 11 मध्ये संधी मिळते ते पाहणे महत्त्वाचे आहे.

बोलिंगचं आक्रमण कसं असणार?

युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चाहर, क्रुणाल पंड्या, वरुण चक्रवर्ती, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल रवि बिश्नोई, असे एकाहून एक सरस स्पिनर्सचे पर्याय भारतीय संघाजवळ आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये कमाल करुन दाखवली आहे.

भुवनेश्वर कुमारला इंग्लंड दौर्‍यात संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत तो श्रीलंका दौऱ्यावर जाणार हे जवळपास नक्की आहे. तो कर्णधारपदाचा दावेदारही होऊ शकतो. दीपक चाहर, नवदीप सैनी, युवा गोलंदाज कार्तिक त्यागी, टी नटराजन हे भुवीच्या साथीला असतील. तसेच कमलेश नागरकोटी, ईशान पोरेल आणि शिवम मावी असे पर्याय आहेत.

संबंधित बातम्या  

विराट, रोहित आणि बुमराहशिवाय टीम इंडियाचा श्रीलंका दौरा, कर्णधार, सलामीवीर, स्पिनर कोण असणार?

(India tour of Sri Lanka in July scheduled ODI and T20 matches team India)