Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे याची ‘ती’ चूक टीम इंडियाला 7 वर्षांनी पडणार महाग?

| Updated on: Feb 25, 2023 | 8:30 PM

दुसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांनी स्पिनर्समोर नांगी टाकली होती. मात्र एक खेळाडू ज्याने पहिल्या डावात वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं होतं.

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे याची ती चूक टीम इंडियाला 7 वर्षांनी पडणार महाग?
Follow us on

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांनी स्पिनर्समोर नांगी टाकली होती. मात्र एक खेळाडू ज्याने पहिल्या डावात वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं होतं. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून पीटर हँड्सकॉम्ब आहे. रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या गोलंदाजीसमोर कोणाचाही निभाव लागला नव्हता. मात्र हँड्सकॉम्ब एकटा मैदानात टिकून राहिला होता.

पीटरला सामना झाल्यावर, बाकी फलंदाज खेळपट्टीवर टिकत नव्हते. तू कशा काय धावा केल्यास? यावर बोलताना, भारतीय खेळपट्ट्यांवर खेळताना स्पिनर्सला कशा पद्धतीने सामोरं जायचं याबाबत अजिंक्य रहाणे याने तंत्र सांगितल्याचा फायदा झाल्याचं त्याने सांगितलं.

अजिंक्य रहाणेने नेमका काय दिला होता सल्ला?

2016 च्या आयपीएलवेळी रहाणे पीटर हँड्सकॉम्ब यांनी ड्रेसिंग रूम शेअर केली होती. त्यावेळी रहाणेने हँड्सकॉम्बला स्पिनर्सचा सामना कसा करायचा याबाबतच्या तंत्राबद्दलची माहिती दिली होती. रहाणेने हँड्सकॉम्बला फिरकीपटूंना सामोर जाताना पायांचा आणि मनगटाचा वापर कसा करायचा हे सांगितलं होतं.

अजिंक्य रहाणे स्पिनर्सविरूद्ध फलंदाजी करताना अगदी सहजपणे खेळत होता. मागील पायाचा आणि मनगटाचा अगदी चालाखपणे मिड विकेटच्या दिशेने चेंडू मारत होता. तेव्हा मलाही वाटलं होतं की, आपल्यालाही हे शिकायला हवं. त्यावेळी मला रहाणेने सांगितलं होतं. दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 132 चेंडूंच्या तुलनेत नाबाद 72 धावा हँड्सकॉम्बने केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात स्वीप शॉच मारण्याच्या प्रयत्नात तो खातंही न उघडता बाद झाला होता.

दरम्यान, तिसऱ्या कसोटी इंदूर येथे होणार आहे. कांगारूंच्या संघाला मालिकेमधील पहिला विजय अजुनही मिळवता आला नाही. मात्र पीटर हँड्सकॉम्ब आता भारतीय संघासाठी डोकदुखी ठरू शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये पाटा पिचवर खेळणाऱ्या कांगारूंना भारतामध्ये अडचण होताना दिसते.

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेविड वॉर्नर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.