IND vs AUS 3rd Test : रोहित शर्माने जिंकला टॉस, अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11

IND vs AUS 3rd Test : बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात टॉसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इंदोर कसोटीतही टॉस महत्त्वाचा ठरणार आहे. फक्त मालिका विजयच नाही, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर टीम इंडियाची नजर आहे.

IND vs AUS 3rd Test : रोहित शर्माने जिंकला टॉस, अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11
ind vs aus 3rd test
Image Credit source: BCCI
| Updated on: Mar 01, 2023 | 9:12 AM

IND vs AUS 3rd Test : नागपूर आणि दिल्लीनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलियाची टीम तिसऱ्या टेस्ट मॅचसाठी इंदोरमध्ये आहे. आजपासून होळकर स्टेडियममध्ये टेस्ट मॅच सुरु होईल. टीम इंडियाने या सीरीजमध्ये आधीच आघाडी घेतली आहे. टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. आता इंदोर कसोटी जिंकून टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी आहे. इंदोर कसोटी जिंकून टीम इंडियाचा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान पक्क करण्याचा प्रयत्न असेल.

कोणी जिंकला टॉस?

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाची प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, उमेश यादव, मोहम्मद सिराज,

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग XI

ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कॅप्टन), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नाथन लॉयन, मॅथ्यू कुहनेमन

स्मिथकडे नेतृत्व

हा कसोटी सामना जिंकून सीरीजमध्ये बरोबरी साधण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. स्टीव्ह स्मिथकडे ऑस्ट्रेलियाच नेतृत्व आहे. कारण नियमित कॅप्टन पॅट कमिन्स आजारी आईची काळजी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियात मायदेशी परतला आहे.


ही कसोटी किती दिवसात संपेल?

दिल्ली आणि नागपूर दोन्ही कसोटी सामने टीम इंडियाने तीन दिवसात निकाली काढले. दोन्ही कसोटी सामन्यांवर टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. भारताची फिरकी गोलंदाजी खेळणं ऑस्ट्रेलियन टीमला झेपत नाहीय. दोन्ही कसोटी सामन्यात एकाच सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला.

त्यामुळे टीम इंडियाची फिरकी गोलंदाजी कशी खेळायची? हा त्यांच्यासमोरच मुख्य प्रश्न आहे. टीम इंडिया तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11 काय निवडणार? त्याची उत्सुक्ता आहे. कॅप्टन रोहित शर्मा केएल राहुल आणि शुभमन गिल या दोघांपैकी कोणाची निवड करतो त्याची उत्सुक्ता आहे.

चौथ्यांदा सीरीज जिंकण्याची संधी

भारतीय टीमकडे सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. याआधी भारताने दोनवेळा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवलं आहे. 2016 साली भारताने मायदेशात ही सीरीज जिंकली होती.