IND vs AUS: रोहित शर्मा टेन्शनमध्ये, ‘या’ चार प्रश्नांच काय करणार?

टीम इंडियात एकापेक्षाएक सरस खेळाडू, पण प्रश्नच संपत नाहीत, असं का?

IND vs AUS: रोहित शर्मा टेन्शनमध्ये, या चार प्रश्नांच काय करणार?
rohit sharma
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Sep 19, 2022 | 3:46 PM

मुंबई: टीम इंडिया मंगळवारपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन टी 20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. पहिला सामना मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही टीम्स पहिला सामना जिंकण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही टीम्ससाठी ही सीरीज महत्त्वाची आहे. कारण टी 20 वर्ल्ड कप जवळ आहे. दोन्ही टीम्सना आपल्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत.

रोहित शर्मासमोर चार प्रश्न आहेत. आशिया कपमधील चार कमतरतांवर त्याला काम करायचं आहे. या समस्या टेन्शन सारख्या आहेत.

  1. विकेटकीपरची निवड हे रोहित शर्मा समोरच पहिलं टेन्शन आहे. रोहित सध्या ऋषभ पंतला वारंवार संधी देतोय. पण पंत फलंदाजीत अपयशी ठरतोय. आशिया कपमध्ये पंतने खराब कामगिरी केली. संपूर्ण आशिया कपमध्ये दिनेश कार्तिक फक्त एक चेंडू खेळला. रोहित शर्मा आता आपला विकेटकीपर बदलणार?
  2. रवींद्र जाडेजाच्या जागी दुसरा ऑलराऊंडर कोण? हे रोहित शर्मासमोरच दुसरं टेन्शन आहे. आशिया कपमध्ये रोहितने दीपक हुड्डाला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली. पण गोलंदाजी दिली नाही. आता प्लेइंग इलेवनमध्ये अक्षर पटेलला संधी मिळणार? हा प्रश्न आहे. अक्षर पटेल गोलंदाजी बरोबर फायनल ओव्हर्समध्ये मोठे फटके खेळू शकतो.
  3. रोहित शर्माने बेधडक फलंदाजीची रणनिती आखली आहे. पण त्याची किंमत टीम इंडियाला चुकवावी लागतेय. सर्वच फलंदाज वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यात त्यांची विकेट जाते. रोहित समोरच हे तिसरं टेन्शन आहे.
  4. रोहित शर्माच्या धावांमध्ये सातत्य नाहीय. हे चौथ टेन्शन आहे. रोहित शर्मा वेगाने धावा बनवण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावतो. आशिया कपमध्ये हे दिसून आलं. रोहितला सेट होऊन खेळण्याची आवश्यकता आहे. कारण फलंदाजाने धावा केल्या, तर संघाच्या जिंकण्याची शक्यता जास्त असते.