AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India W vs England W, 3rd T20 live streaming: भारत विरुद्ध इंग्लंड, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात आज टी-20 मालिकेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघानी 1-1 सामना जिंकल्यामुळे आजचा सामना निर्णायक असेल.

India W vs England W, 3rd T20 live streaming: भारत विरुद्ध इंग्लंड, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
भारतीय महिला क्रिकेट संघ
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 10:26 AM
Share

लंडन : भारतीय महिला इंग्लंड दौऱ्यावर असून एकमेव टेस्ट सामना अनिर्णीत ठरल्यानंतर एकदिवसीय मालिकेतही भारताला 2-1 ने पराभव स्वीकारावा लागला. मात्र टी-20मालिकेत भारतीय महिलांनी जशास तसे उत्तर देत पहिला सामना पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे आज भारत विरुद्ध इंग्लंड (India Women vs England Women) महिला संघातील तिसरी टी-20 मॅच मालिका निर्णायक ठरणार आहे. (India vs England 3rd t20 live Streaming When And Where To watch online to free in marathi)

पहिल्या टी-20 सामन्यात पासामन्यात पावसाने व्यत्यय आणला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 7 विकेट गमावून 177 धावा केल्या. परंतु पावसाने व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 8.4 ओव्हरमध्ये 73 धावांचा टप्पा पार करावा लागणार होता. परंतु निर्धारित षटकांमध्ये भारताने तीन विकेट्स गमावून 54 धावा केल्या. त्यामुळे सामन्यात भारताचा 18 धावांनी पराभव झाला. मात्र दुसऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंडला दिलेले 148 धावांचे टार्गेट डिफेन्ड करत इंग्लंडवर 8 धावांनी अप्रतिम विजय मिळवला.

सामना कुठे खेळविला जाणार

भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील तिसरा टी -20 सामना बुधवार, 14 जुलै रोजी चेम्सफर्डच्या काउंटी मैदानावर खेळवला जाईल.

सामन्याला कधी सुरुवात होणार?

भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील तिसरा टी -20 सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरू होईल. नाणेफेक रात्री 10.30 वाजता होईल.

सामना कुठे पाहणार?

भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील तिसरा टी -20 सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?

भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील तिसऱ्या टी -20 सामन्याचं Live Streaming SONY LIVE वर असेल.

हे ही वाचा :

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेटपटू सज्ज, सामन्यांपूर्वी ‘ही’ चाचणी अनिवार्य

Sourav Ganguly Biopic : लॉर्ड्सवर पुन्हा टी शर्ट भिरकावणार, दादागिरी मोठ्या पडद्यावर झळकणार, गांगुलीच्या भूमिकेत कोण?

Photo : इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचा डंका, जगातील सर्वांत प्रभावशाली खेळाडूंमध्ये तिसरा, ‘हे’ आहेत Top 5

(India vs England 3rd t20 live Streaming When And Where To watch online to free in marathi)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...