Photo : इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचा डंका, जगातील सर्वांत प्रभावशाली खेळाडूंमध्ये तिसरा, ‘हे’ आहेत Top 5

क्रिकेट जगतात सध्या खेळत असलेल्या फलंदाजामध्ये सर्वात हिट म्हणजे भारतीय कर्णधार विराट कोहली. क्रिकेट जगतासह कोहली सोशल मीडियावरही हिट आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असणारा भारतीय विराट आता इन्स्टाग्रामवरील जगातील सर्वात प्रभावशाली खेळाडूंमध्येही टॉप 3 मध्ये पोहोचला आहे.

1/6
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कोट्यावधी कमावतो हे तुम्ही जाणताच. त्याने
एखाद्या कंपनीची इन्स्टावर ब्रँडिग करताच ते त्याला कोट्यावधी रुपये देतात. पण विराटची सोशल मीडियावर असणारी हवा किती आहे याचा अंदाज
नुकत्याच समोर आलेल्या माहितीवरुन होते. हाइप ऑडिटरने (Hype Auditor) इन्स्टाग्रामवर जगभरातील सर्वात 1000 प्रभावशाली व्यक्तींची
यादी जाहिर केली. या यादीत खेळाडूंचा विचार करता विराट तिसरा सर्वात प्रभावशाली खेळाडू असल्याचे समोर आले आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर कोण आहे?
ते तुम्हीच पाहा...
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कोट्यावधी कमावतो हे तुम्ही जाणताच. त्याने एखाद्या कंपनीची इन्स्टावर ब्रँडिग करताच ते त्याला कोट्यावधी रुपये देतात. पण विराटची सोशल मीडियावर असणारी हवा किती आहे याचा अंदाज नुकत्याच समोर आलेल्या माहितीवरुन होते. हाइप ऑडिटरने (Hype Auditor) इन्स्टाग्रामवर जगभरातील सर्वात 1000 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहिर केली. या यादीत खेळाडूंचा विचार करता विराट तिसरा सर्वात प्रभावशाली खेळाडू असल्याचे समोर आले आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर कोण आहे? ते तुम्हीच पाहा...
2/6
या यादीमध्ये सर्वात अव्वल स्थानी आहे पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो 
(Cristiano Ronaldo). विशेष म्हणजे रोनाल्डो केवळ खेळाडूंमध्येच नाही तर या संपूर्ण 1000 व्यक्तींच्या लिस्टमध्येही 
अव्वल पहिल्या स्थानावर आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल 311.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
या यादीमध्ये सर्वात अव्वल स्थानी आहे पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo). विशेष म्हणजे रोनाल्डो केवळ खेळाडूंमध्येच नाही तर या संपूर्ण 1000 व्यक्तींच्या लिस्टमध्येही अव्वल पहिल्या स्थानावर आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल 311.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
3/6
रोनाल्डोनंतर या यादीत नंबर लागतो त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी लिओनल मेस्सीचा (Lionel Messi). सर्वात प्रभावशाली खेळाडूंच्या लिस्टमध्ये
दुसरा असणारा मेस्सी 1000 व्यक्तींच्या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. मेस्सीलाही जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखलं जातं. मेस्सी
आणि रोनाल्डो यांच्यात मैदानावर कायमच चुरशीची लढत असते जी इथेही दिसून आली.
रोनाल्डोनंतर या यादीत नंबर लागतो त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी लिओनल मेस्सीचा (Lionel Messi). सर्वात प्रभावशाली खेळाडूंच्या लिस्टमध्ये दुसरा असणारा मेस्सी 1000 व्यक्तींच्या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. मेस्सीलाही जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखलं जातं. मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यात मैदानावर कायमच चुरशीची लढत असते जी इथेही दिसून आली.
4/6
मेस्सीनंतर सर्वांत प्रभावशाली खेळाडू म्हणून विराटचा नंबर लागतो. टीम इंडियाचा कर्णधार असणाऱ्या विराटचे इन्स्टाग्रामवर 135.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
खेळाडूंमध्ये तिसऱ्य़ा क्रमांकावर असणारा विराट संपूर्ण यादीत 12 व्या क्रमांकावर आहे.
मेस्सीनंतर सर्वांत प्रभावशाली खेळाडू म्हणून विराटचा नंबर लागतो. टीम इंडियाचा कर्णधार असणाऱ्या विराटचे इन्स्टाग्रामवर 135.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. खेळाडूंमध्ये तिसऱ्य़ा क्रमांकावर असणारा विराट संपूर्ण यादीत 12 व्या क्रमांकावर आहे.
5/6
या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहे ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेयमार (Neymar). त्याचे इन्स्टाग्रामवर 154 मिलियन फॉलोअर्स आहेत.
प्रभावशाली खेळांडूमध्ये चौथ्या क्रमांकावर असणारा नेयमार 1000 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत 23 व्या क्रमांकावर आहे.
या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहे ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेयमार (Neymar). त्याचे इन्स्टाग्रामवर 154 मिलियन फॉलोअर्स आहेत. प्रभावशाली खेळांडूमध्ये चौथ्या क्रमांकावर असणारा नेयमार 1000 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत 23 व्या क्रमांकावर आहे.
6/6
टॉप 5 प्रभावशाली खेळाडूंमध्ये पाचव्या स्थानावर आहे फ्रान्सचा युवा फुटबॉलपटू म्बापे (Mbappe). त्याचे इन्स्टाग्रामवर 54.1 फॉलोअर्स आहेत. टॉप 5 खेळाडंमध्ये
असणारा म्बापे 1000 जणांच्या यादीत 36 व्या स्थानावर आहे.
टॉप 5 प्रभावशाली खेळाडूंमध्ये पाचव्या स्थानावर आहे फ्रान्सचा युवा फुटबॉलपटू म्बापे (Mbappe). त्याचे इन्स्टाग्रामवर 54.1 फॉलोअर्स आहेत. टॉप 5 खेळाडंमध्ये असणारा म्बापे 1000 जणांच्या यादीत 36 व्या स्थानावर आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI