IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेटपटू सज्ज, सामन्यांपूर्वी ‘ही’ चाचणी अनिवार्य

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून 4 ऑगस्टपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. 5 कसोटी सामन्यांची मालिका इंग्लंड आणि भारत यांच्यात खेळवली जाणार आहे.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेटपटू सज्ज, सामन्यांपूर्वी 'ही' चाचणी अनिवार्य
भारतीय संघ
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 4:22 PM

लंडन :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) न्यूझीलंडकडून (New Zealand) आठ विकेट्सने पराभूत झाला आणि जगातील पहिला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन (WTC) होण्यापासून थोडक्यात राहिला. या पराभवानंतर आता भारतीय संघ पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी आपली पहिली कसोटी मालिका इंग्लंडच्या भूमितच इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या सामन्यांपूर्वी भारतीय संघ सुट्टीवर विश्रांती घेण्यासाठी म्हणून सुट्टीवर होता. आता ही सुट्टी संपवून भारताचे खेळाडू कसोटी सामन्यांसाठी सज्ज झाले आहेत. मात्र या सामन्यांपूर्वी खेळाडूंना कोरोना चाचणी अनिवार्य असल्याने खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियाची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (Before Playing Test series Against England Indian Cricketers need to do Covid 19 Testing)

भारतीय संघातील खेळाडूंनी कोरोनावरील लशीचा पहिला डोस भारतात घेऊन इंग्लंडला रवाना झाले होते. त्यानंतर इंग्लंडमध्ये खेळाडूंना दुसरा डोस 7 आणि 9 जुलैला देण्यात आला. क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्विसेसच्या मदतीने खेळाडूंना दुसरा डोस देण्यात आला होता. खेळाडूंना दुसरा डोस मिळाल्यानंतर लगेचच खेळाडूंची कोरोना चाचणी सुरु करण्यात आली आहे. खेळाडूंच्या कुटुंबियाची कोरोना चाचणी  करण्यासही सुरुवात झाली आहे.

इंग्लंड संघात आढळले कोरोनाबाधित

भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यापूर्वीच इंग्लंड क्रिकेट संघात कोरोनाने शिरकाव केला. इंग्लंड संघातील 3 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील 4 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेत   इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संपूर्णपणे फिट असणाऱ्या खेळाडूंचा संघ सामने खेळण्यासाठी उतरवला.

काउंटी क्रिकेटमध्येही कोरोनाचा शिरकाव

इंग्लंडच्या राष्ट्रीय संघासोबतच स्थानिक काउंटी क्रिकेटमध्येही कोरोनाच्या काही  केसेस समोर आल्या आहेत. डर्बिशर संघात कोरोनाबाधित खेळाडू आढळल्याने सोमवारचा त्यांचा एसेक्स विरुद्धचा सामना रद्द करण्यात आला. त्याआधी एकदिवस केंट काउंटी संघातही कोरोनारुग्ण आढळला होता.

हे ही वाचा :

Sourav Ganguly Biopic : लॉर्ड्सवर पुन्हा टी शर्ट भिरकावणार, दादागिरी मोठ्या पडद्यावर झळकणार, गांगुलीच्या भूमिकेत कोण?

Photo : इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचा डंका, जगातील सर्वांत प्रभावशाली खेळाडूंमध्ये तिसरा, ‘हे’ आहेत Top 5

BREAKING: 1983 विश्वचषकाचे हिरो यशपाल शर्मा कालवश, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

(Before Playing Test series Against England Indian Cricketers need to do Covid 19 Testing)

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.