BREAKING: 1983 विश्वचषकाचे हिरो यशपाल शर्मा कालवश, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

भारताचे माजी दिग्गज फलंदाज यशपाल शर्मा यांनी भारताकडून 37 टेस्ट आणि 42 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी अनेक अवघड सामने भारताला जिंकवून दिले.

BREAKING: 1983 विश्वचषकाचे हिरो यशपाल शर्मा कालवश, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
यशपाल शर्मा
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 11:44 AM

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण असणारा 1983 विश्वचषक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेले माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांचे निधन झाले आहे. मंगळवारी (13 जुलै) सकाळच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने शर्मा यांचे निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. भारताकडून 37 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळलेल्या शर्मा यांनी टेस्टमध्ये 2 शतकांच्या मदतीने 1606 रन्स बनवले होते. तर वनडे क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 89 रन्स आहेत. पण 1983 च्या विश्वचषकात त्यांनी खेळलेले काही सामने हे आजही सर्वांच्या स्मरणात आहेत आणि त्यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळेच भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचू शकला होता. (Indias Former Cricketer Who Played Good Role in 1983 Wolrd Cup is No more Yashpal Sharma Passes Away due to Heart Attack)

यशपाल शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरोधात सियालकोट येथील एकदिवसीय सामन्यात 1978 मध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर त्यांनी पहिली टेस्ट इंग्लंड विरोधात क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर खेळली होती. शर्मा यांनी 1985 मध्ये इंग्लंड विरोधात चंदीगढ़ येथे शेवटची वन-डे खेळली होती. तर वेस्टइंडीज विरोधात दिल्ली येथे 1983 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

1983 विश्वचषकाचा हीरो

पंजाब संघाकडून रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या यशपाल शर्मा  यांनी 1978 मध्ये भारतीय क्रिकेट संघात वनडेमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 1979 मध्ये टेस्ट डेब्यू केला.  6 वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीत यशपाल यांनी 37 टेस्टमध्ये 1606 धावा केल्या ज्यात दोन शतकांचा समावेश होता. तर 42 वनडेमध्ये 883 धावा केल्या. पण 1983 च्या विश्वचषकात यशपाल यांनी कामगिरी वाखाणण्याजोगी होती. वेस्टइंडीज विरोधातील पहिल्याच सामन्यात त्यांनी 89 धावंची दमदार खेळी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरोधातही 40 धावंची महत्त्वाची खेळी करणाऱ्या यशपाल यांनी सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरोधात 61 धावांची खेळी करुन सामना जिंकवून दिला होता.

निवृत्तीनंतरही क्रिकेटशी नाते कायम

भारताच्या फलंदाजीत मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज असणारे यशपाल शर्मा हे संपूर्ण आयुष्य क्रिकेटशी जोडून राहिले. क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही ते कोणत्या न कोणत्या मार्गाने क्रिकेटशी जोडून होते. ते टीम इंडियाचे राष्ट्रीय निवडकर्ते देखील होते. आधी डिसेंबर 2005 पर्यत निवडकर्ता म्हणून राहिलेले शर्मा 2008 मध्ये पुन्हा निवडकर्ते म्हणून भारतीय संघाशी जोडले गेले होते.

हे ही वाचा :

Dilip Kumar Death : दिलीप कुमार यांच्या शिफारसीने मिळाला ‘या’ क्रिकेटपटूला ब्रेक, विश्वचषक विजेत्या संघातही दमदार कामगिरी

भारतीय महिलांना 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यश, दिर्घकाळापासूनची अपयशाची मालिका खंडित

अभूतपूर्व! हरलीनने टिपलेल्या झेलाचे मोदींकडूनही कौतुक, इन्स्टाग्राम स्टोरीतून केलं अभिनंदन

(Indias Former Cricketer Who Played Good Role in 1983 Wolrd Cup is No more Yashpal Sharma Passes Away due to Heart Attack)

Non Stop LIVE Update
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....