Dilip Kumar Death : दिलीप कुमार यांच्या शिफारसीने मिळाला ‘या’ क्रिकेटपटूला ब्रेक, विश्वचषक विजेत्या संघातही दमदार कामगिरी

भारताने मिळवलेल्या इतिहासातील पहिल्या विश्वचषकाच्या भारतीय संघात एक दिग्गज खेळाडू होता ज्याने फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर लिलया पेलली होती. त्याची शिफारस बीसीसीआयकडे ही दिलीप कुमार यांनीच केली होती.

Dilip Kumar Death : दिलीप कुमार यांच्या शिफारसीने मिळाला 'या' क्रिकेटपटूला ब्रेक, विश्वचषक विजेत्या संघातही दमदार कामगिरी
दिलीप कुमार यांनी यशपाल शर्मा यांची शिफारस बीसीसीआयकडे केली होती.

मुंबई : दिलीप कुमार (Dilip Kumar) म्हणजे भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील एक अजरामर नाव. केवळ चित्रपटात काम करुन प्रेक्षकांच्या मनोरंजनापलिकडेही दिलीप यांनी त्या भूमिकांतून स्वत:ला देशातील एक मानाचा व्यक्ती बनवलं. अशा या महान अभिनेत्याच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. मात्र दिलीप यांच्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतील. दिलीप हे केवळ रुपेरी पडद्यावरच हिरो नव्हते, तर अनेकांच्या आयुष्यातही त्यांनी हिरोची भूमिका निभावली होती. फिल्म इंडस्ट्रीसह अनेक क्षेत्रात त्यांनी टॅलेंट असणाऱ्या व्यक्तींना संधी दिली. अशी संधी त्यांनी भारताचे माजी दिग्गज फलंदाज यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांना दिली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) दिलीप यांनी शर्मा यांची शिफारस केल्यानंतरच त्यांना भारतीय संघात (Indian Cricket Team) संधी देण्यात आली होती. (Legendry Actor Dilip Kumar Passes Away he Helped Former Cricketer Yashpal Sharma Career by suggesting his name to BCCI)

यशपाल शर्मा यांनी स्वत: एका टीवी शोमध्ये या गोष्टीबाबत खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की,  दिलीप कुमार यांनीच त्यांच्या करीयरला खरी दिशा दिली आणि त्यामुळेच ते भारतीय संघात पोहचू शकले होते. दिलीप कुमारांना आपला आवडता अभिनेता सांगत यशपाल त्यांना कायम यूसुफभाई म्हणत असंही सांगितलं. “माझी क्रिकेट कारकिर्द बनवणारे ते आहेत. त्यांनी मला रणजी ट्रॉफीतून भारतीय संघात पोहोचवलं. मी त्यांच्या सोबत भावनिक नात्याने जोडलो आहे. ते आजारी पडले की मला त्रास होतो.” असंही यशपाल म्हणाले होते.

रणजीत खेळताना पहिल्यांदा पाहिले

दिलीप यांच्याबद्दल बोलताना यशपाल म्हणाले, “मी एका रणजी चषकाच्या सामन्यात दुसऱ्या डावांत दुसरे शतक मारण्याच्या जवळ होतो. त्यावेळी मला दिलीप यांनी पाहिलं आणि लगेचच बीसीसीआयला माझ्याबद्दल बोलताना म्हणाले पंजाब संघातला मुलगा आहे. त्याच्याकडे पाहा,त्याच्यात कला आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळू शकतो. या शिफारसीमुळेच माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिेकटचा प्रवेश सुकर झाला. ज्याचे कारण बनले यूसुफ भाई.”

1983 विश्वचषकाचा हीरो

पंजाब संघाकडून रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या यशपाल शर्मा  यांनी 1978 मध्ये भारतीय क्रिकेट संघात वनडेमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 1979 मध्ये टेस्ट डेब्यू केला.  6 वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीत यशपाल यांनी 37 टेस्टमध्ये 1606 धावा केल्या ज्यात दोन शतकांचा समावेश होता. तर 42 वनडेमध्ये 883 धावा केल्या. पण 1983 च्या विश्वचषकात यशपाल यांनी कामगिरी वाखाणण्याजोगी होती. वेस्टइंडीज विरोधातील पहिल्याच सामन्यात त्यांनी 89 धावंची दमदार खेळी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरोधातही 40 धावंची महत्त्वाची खेळी करणाऱ्या यशपाल यांनी सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरोधात 61 धावांची खेळी करुन सामना जिंकवून दिला होता.

संबंधित बातम्या:

Dilip Kumar Death: दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी सायकलवरून गेलो होतो, शरद पवारांनी जागवल्या ट्रॅजेडी किंगच्या आठवणी!

Dilipkumar Death | ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन, बॉलिवूडवर शोककळा

Dilip Kumar Death | मोहम्मद युसुफ खान कसे बनले दिलीप कुमार? जाणून घ्या ‘या’ नावामागची कहाणी..

(Legendry Actor Dilip Kumar Passes Away he Helped Former Cricketer Yashpal Sharma Career by suggesting his name to BCCI)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI