अभूतपूर्व! हरलीनने टिपलेल्या झेलाचे मोदींकडूनही कौतुक, इन्स्टाग्राम स्टोरीतून केलं अभिनंदन

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 11, 2021 | 6:58 PM

भारत आणि इंग्लंड महिलांमध्ये पार पडलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा थोडक्यात पराभव झाला. पण या सामन्यात भारताच्या हरलीन देओलने टिपलेल्या झेलाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून मोदींनी देखील याची दखल घेतली आहे.

अभूतपूर्व! हरलीनने टिपलेल्या झेलाचे मोदींकडूनही कौतुक, इन्स्टाग्राम स्टोरीतून केलं अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीला हरलीनचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Follow us on

नवी दिल्ली :  भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England T20) यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारत 18 धावांनी पराभूत झाला. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि निर्धारीत षटकात भारत लक्ष्य पार करु न शकल्याने पराभूत झाला. पण या संपूर्ण सामन्यात लक्षात राहीला तो सुपर वुमन हरलीन देओलने (Harleen Deol) टीपलेला अप्रतिम झेल. सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना हरलीनने असा काही अप्रतिम कॅच पकडला, की जो कॅच कित्येक वर्ष भारतीय क्रिकेट रसिकांच नाही तर संपूर्ण जगातील क्रिकेटरसिक विसरु शकणार नाहीत. महिला क्रिकेटमधील एक ऐतिहासिक झेल म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही अशा या झेलाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील घेतली आहे. मोदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हरलीनच्या कॅचचा व्हिडिओ शेअर केला आहे. (PM Narendra Modi Congratulate Harleen Deol For her Awsome catch In India vs England 1st t 20 match)

मोदी यांनी हरलीनचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टास्टोरीला शेअर करत त्याला एक अप्रतिम कॅप्शनही दिलं आहे. त्यांनी या स्टोरीत हरलीनला टॅग केले असून  सोबतच ‘अभूतपूर्व, अभिनंदन’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींसह सर्वच स्तरातून या कॅचचे कौतुक होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हा झेल सर्वात अप्रतिम असल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच अनेक क्रिकेटपटूंनी या झेलाचे कौतुक केले असून यात  हरभजन सिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण इत्यांदी खेळाडूंचा समावेश होतो. क्रिकेटपटूंशिवाय नेटकऱ्यांनीतर या कॅचला अक्षरश: डोक्यावर उचलले असून अनेकांनी या झेलाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

PM Modi Shares Harleens catch video

नरेंद्र मोदी यांची इन्स्टाग्राम स्टोरी

असा टीपला झेल

सामन्यात इंग्लंड प्रथम फलंदाजी करत होता.  19 वी ओव्हर सुरू होती. 19 व्या ओव्हरमधल्या पाचव्या बॉलवर इंग्लंडच्या जोन्स अॅमीने (Amy Jones) जोरदार फटका मारला. त्यावेळी बाउंड्री लाईनवर हरलिन फिल्डिंग करत होती. बॉलचा अंदाज घेऊन तिने कॅच पकडण्याचा निश्चय केला. बॉल सीमारेषेपार जाणार हे ठरलं होतं… परंतु हरलीनने हवेत सूर मारत पहिल्यांदा बॉलवर ताबा मिळवला. पण आपण सीमारेषेबाहेर आहोत, हे कळताच तिने हवेतूनच बॉलला सीमारेषेच्या आत टाकलं आणि पुन्हा सूर  मारत कॅच घेतला.

हे ही वाचा :

India W vs England W, 2nd T20 live streaming: भारत विरुद्ध इंग्लंड, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

Video : भारताच्या हरलीन देओलचा सुपर कॅच, नेटकरी म्हणतायत, ‘जाडेजालाही फिकं पाडलं’!

Tokyo Olympics 2020 साठी रवाना होणाऱ्या भारताच्या शिलेदारांना क्रिकेटपटूंच्या शुभेच्छा, मोदींच्या cheer4india ला साद

(PM Narendra Modi Congratulate Harleen Deol For her Awsome catch In India vs England 1st t 20 match)

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI