Video : भारताच्या हरलीन देओलचा सुपर कॅच, नेटकरी म्हणतायत, ‘जाडेजालाही फिकं पाडलं’!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 10, 2021 | 9:08 AM

India vs England Women 1st T 20 : या सामन्यात भलेही भारताचा पराभव झाला असेल परंतु हा सामना लक्षात राहील तो सुपर वुमन हरलीन देओलच्या (Harleen Deol) कॅचमुळे...

Video : भारताच्या हरलीन देओलचा सुपर कॅच, नेटकरी म्हणतायत, 'जाडेजालाही फिकं पाडलं'!
हरलीन देओलचा सुपर कॅच...
Follow us

India vs England Women T 20 :  भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England T20) यांच्यातल्या टी-ट्वेन्टी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी पार पडला. या सामन्यात भलेही भारताचा पराभव झाला असेल परंतु हा सामना लक्षात राहील तो सुपर वुमन हरलीन देओलच्या (Harleen Deol) कॅचमुळे… हरलीनने असा काही अप्रतिम कॅच पकडलाय, की जो कॅच कित्येक वर्ष भारतीय क्रिकेट रसिकांच्या नव्हे तर जगभरातील क्रिकेट रसिकांच्या डोळ्यासमोरुन जाणार नाही… (India vs England Women 1st T 20 Harleen Deol Super Catch Video)

सुपर… शानदार… जबरदस्त…!

इंग्लंडच्या डावाची 19 वी ओव्हर सुरू होती. 19 व्या ओव्हरमधल्या पाचव्या बॉलवर इंग्लंडच्या जोन्स अॅमीने (Amy Jones) जोरदार फटका मारला. त्यावेळी बाउंड्री लाईनवर हरलिन फिल्डिंग करत होती. बॉलचा अंदाज घेऊन तिने कॅच पकडण्याचा निश्चय केला. बॉल सीमारेषेपार जाणार हे ठरलं होतं… परंतु हरलीनने हवेत सूर मारत पहिल्यांदा बॉलवर ताबा मिळवला. पण आपण सीमारेषेबाहेर आहोत, हे कळताच तिने हवेतूनच बॉलला सीमारेषेच्या आत टाकलं आणि पुन्हा सूर  मारत कॅच घेतला.

हरलीनच्या कॅचला प्रतिस्पर्ध्यांचीही दाद

हरलीनची चित्त्यासारखी चपळाई पाहून अनेक जण अवाक झाले. भारताच्या खेळाडू तर एवढ्या खूश झाल्या की सारे जण तिच्या डोक्यावरुन हात फिरवून तिला शाबासकी देऊ लागले. एवढंच नव्हे तर इंग्लंडच्या संघातील महिला खेळाडूंनीही हरलीनचं टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केलं.

नेटकऱ्यांनी तर हरलीनला डोक्यावर घेतलंय….!

नेटकऱ्यांनी तर हरलीनला डोक्यावर घेतलंय…आणि का घेऊ नये… हरलीनने डोळ्यांचं पारणं फेडणारा कॅच घेतलाय, तिने भल्याभल्या दिग्गजांना लाजवलंय… नेटकरी हरलीनची सर रवींद्र जाडेजाशी तुलना करु लागले आहेत. ट्विटरवर तर हा कॅच आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलाय… तसंच सोशल मीडियावर हा कॅच ट्रेंड होतोय.

मैदान कुणी मारलं…?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 7 विकेट गमावून 177 धावा केल्या. परंतु पावसाने व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 8.4 ओव्हरमध्ये 73 धावांचा टप्पा पार करावा लागणार होता. परंतु निर्धारित षटकांमध्ये भारताने तीन विकेट्स गमावून 54 धावा केल्या. या सामन्यात भारताचा 18 धावांनी पराभव झाला.

(India vs England Women 1st T 20 harleen Deol Super Catch Video)

हे ही वाचा :

India W vs England W, 1st T20 live streaming: भारत विरुद्ध इंग्लंड, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

निवृत्तीनंतर धोनी कोणती कामं करतोय आणि या विकेट कीपर फलंदाजाने काय केलं पाहा…

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI