भारतीय महिलांना 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यश, दिर्घकाळापासूनची अपयशाची मालिका खंडित

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. एकमेव कसोटी सामना अनिर्णीत सुटल्यानंतर एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघ 2-1 ने पराभूत ठरला. पण टी-20 मालिका सुरु होताच भारतीय महिलांनी 15 वर्षांपासून प्रतिक्षा करत असलेल्या कामगिरीला गवासणी घातली.

भारतीय महिलांना 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यश, दिर्घकाळापासूनची अपयशाची मालिका खंडित
भारतीय महिला दुसऱ्या टी-20 सामन्यात विजयी
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 5:04 PM

India vs England Women Cricket : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women Cricket Team) इंग्लंड संघाला टी-20 मालिकेतील दूसऱ्या सामन्यातच 8 धावांनी मात देत विजय मिळवला. यासोबतच मालिकेत देखील 1-1 ची बरोबरी साधली. भारताने प्रथम फलंदाजी करत 4 विकेट्सच्या बदल्यात केलेल्या 148 धावा इंग्लंडचा संघ 20 षटकांत करु शकला नाही. इंग्लंडच्या महिला 20 षटकांत 8 विकेटच्या बदल्यात 140 धावाच करु शकल्याने भारतीय संघ विजयी झाला. सामन्यात भारती. संघाने उत्कृष्ठ क्षेत्ररक्षाचे दर्शन घडवले. भारतीय संघाने इंग्लंडच्या चार महत्त्वाच्या खेळाडूंना रन आउट केल्याने सामना जिकण्यात यश मिळवलं. दरम्यान हा विजय भारतीय महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. कारण 2006 पासून भारतीय महिला संघाला इंग्लंडविरोधात टी-20 सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे या विजयासह तब्बल 15 वर्षानंतर भारतीय महिलांना यश मिळालं. (Indian Womens Won t20 Match Against England Womens after 15 years)

भारताकडून सुरुवातीला शेफालीने धडाकेबाज 48 धावा केल्यात. त्यानंतर गोलंदाजीत पूनम यादवने दोन विकेट मिळवल्या. अखेर एका ओव्हरमध्ये 14 धावांची गरज असताना अष्टपैलू स्नेह राणाने उत्तम गोलंदाजी करत केवळ 6 धावा देत भारताला 8 धावांनी विजय मिळवून दिला. राणाने सामन्यात विकेट घेतला नसला तरी अप्रतिम गोलंदाजी करत चार ओव्हरमध्ये केवळ 21 धावा दिल्या.

शेफाली-स्मृतिची दमदार सुरुआत

सामन्यात इंग्लंड संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे फलंदाजीला भारताकडून शेफाली वर्मा (Shefali Verma) आणि स्मृती मंधाना (Smriti Mandhana) या दोघी आल्या. मागील सामन्यात लगेच बाद झालेल्या शेफालीने यावेली कोणतीही चूक न करता जबरदस्त सुरुआत केली. शेफाली आणि स्मृतिने पहिल्या विकेटसाठी0 70 धावांची भागिदारी रचली. विशेष म्हणजे शेफालीने ब्रंटच्या ओव्हरला सलग पाच चौकार ठोकले. तिने 38 चेंडूत 8 चौकर आणि 1 षटकार ठोकत 48 धावा केल्या तर स्मृतीने 20 धावा केल्या. या दोघींनी अप्रतिम सुरुवात करुन दिली तरी पुढील फलंदाजाना खास कामगिरी करता न आल्याने भारत 20 षटकांत केवळ  148 धावांच करु शकला.

पहिला सामना जिंकला होता भारताने

विशेष म्हणजे जेव्हा पहिल्यांदा भारतीय महिलांनी  इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडला पराभूत केलं होते तो सामना ही टी-20 सामनाच होता. यावेळी भारत 8 विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर 2008 मधील सामना पावसामुळे रद्द केला होता. पुन्हा 2009 मध्ये टी-20 वर्ल्डकप वेळी इंग्लंडने 10 विकेट्ने भारताला पराभूत केलं. 2011 मध्येही इंग्लंडने 46 धावांनी विजय मिळवला. 2012 मध्ये झालेल्या दोन टी-20 सामन्यातही भारत आठ विकेट आणि 33 धावांनी पराभूत झाला होता. त्यानंतर यंदाही पहिला सामना इंग्लंडने जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने पुनरागमन करत 8 धावांनी विजय मिळवला आणि 15 वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली. आतापर्यंतचा विचार करता 21 सामन्यांतील 5 सामने भारत तर 16 सामने इंग्लंडच्या संघाने जिंकले आहेत.

हे ही वाचा :

India W vs England W, 2nd T20 : उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारतीय महिला विजयी, इंग्लंडवर 8 धावांनी मात

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये धडाकेबाज कामगिरीचा फायदा, ‘या’ खेळाडूला मिळाला ICC Players of the Month चा पुरस्कार

अभूतपूर्व! हरलीनने टिपलेल्या झेलाचे मोदींकडूनही कौतुक, इन्स्टाग्राम स्टोरीतून केलं अभिनंदन

(Indian Womens Won t20 Match Against England Womens after 15 years)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.