India W vs England W, 2nd T20 : उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारतीय महिला विजयी, इंग्लंडवर 8 धावांनी मात

टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढत भारतीय महिलांनी इंग्लंडच्या संघावर विजय मिळवला आहे. अष्टपैलू खेळीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला.

India W vs England W, 2nd T20 : उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारतीय महिला विजयी, इंग्लंडवर 8 धावांनी मात
भारतीय महिला दुसऱ्या टी-20 सामन्यात विजयी
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 1:57 PM

India vs England Women Cricket : एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवानंतर भारतीय महिला संघाची टी-20 मालिकेतही निराशाजनक सुरुवात झाली. पहिलाच सामना 18 धावांनी पराभूत झालेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात मात्र पुनरागमन करत 8 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर इंग्लंडच्या फलंदाजाना रोखत भारतीय महिलांनी सामना आपल्या नावे केला. यावेळी भारती संघाने अप्रतिम फलंदाजीने सामन्याची सुरुवात केली पण मोठा स्कोर उभा करु शकला नाही. त्यानंतर मात्र गोलंदाजीत अचूक कामगिरी सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला. (In India vs England Womens Second t 20 match India beat England by 8 Runs )

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 7 विकेट गमावून 177 धावा केल्या. परंतु पावसाने व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 8.4 ओव्हरमध्ये 73 धावांचा टप्पा पार करावा लागणार होता. परंतु निर्धारित षटकांमध्ये भारताने तीन विकेट्स गमावून 54 धावा केल्या. त्यामुळे सामन्यात भारताचा 18 धावांनी पराभव झाला. पण या पराभवाचा बदला दुसऱ्या सामन्यात घेत आधी फलंदाजी मग गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर विजय मिळवला.

शेफाली-स्मृतिची दमदार सुरुआत

सामन्यात इंग्लंड संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे फलंदाजीला भारताकडून शेफाली वर्मा (Shefali Verma) आणि स्मृती मंधाना (Smriti Mandhana) या दोघी आल्या. मागील सामन्यात लगेच बाद झालेल्या शेफालीने यावेली कोणतीही चूक न करता जबरदस्त सुरुआत केली. शेफाली आणि स्मृतिने पहिल्या विकेटसाठी0 70 धावांची भागिदारी रचली. विशेष म्हणजे शेफालीने ब्रंटच्या ओव्हरला सलग पाच चौकार ठोकले. तिने 38 चेंडूत 8 चौकर आणि 1 षटकार ठोकत 48 धावा केल्या तर स्मृतीने 20 धावा केल्या. या दोघींनी अप्रतिम सुरुवात करुन दिली तरी पुढील फलंदाजाना खास कामगिरी करता न आल्याने भारत 20 षटकांत केवळ  148 धावांच करु शकला.

भारताचे उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण

इंग्लंड फलंदाजीला आला असता दुसऱ्या ओव्हरमध्ये अरुंधति रेड्डीने डॅनी वायला बाद करत इ्ंग्लंडला झटका दिला. त्यानंतर इंग्लंडच्या टॅमी बोउमॉन्ट (59) हिला सोडता एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता न आल्याने 20 षटकात इंग्लंड 8 विकेट्सच्या बदल्यात 140 धावाच करु शकला. यावेळी काही उत्कृष्ठ रन आउट आणि संपूर्ण सामन्यात अप्रतिम क्षेत्ररक्षण भारतीय महिलांनी केल्यामुळे भारत इंग्लंडला दिलेले 148 धावांचे छोटे लक्ष्य देखील डिफेन्ड करु शकला.

हे ही वाचा :

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये धडाकेबाज कामगिरीचा फायदा, ‘या’ खेळाडूला मिळाला ICC Players of the Month चा पुरस्कार

अभूतपूर्व! हरलीनने टिपलेल्या झेलाचे मोदींकडूनही कौतुक, इन्स्टाग्राम स्टोरीतून केलं अभिनंदन

Video : भारताच्या हरलीन देओलचा सुपर कॅच, नेटकरी म्हणतायत, ‘जाडेजालाही फिकं पाडलं’!

(In India vs England Womens Second t 20 match India beat England by 8 Runs)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.