वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये धडाकेबाज कामगिरीचा फायदा, ‘या’ खेळाडूला मिळाला ICC Players of the Month चा पुरस्कार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने जून महिन्यातील ICC Players of the Month पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात भारताच्या दोन महिला खेळाडूंही नामांकित होत्या.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये धडाकेबाज कामगिरीचा फायदा, 'या' खेळाडूला मिळाला ICC Players of the Month चा पुरस्कार
ICC Player Of The Month June

मुंबई : प्रत्येक महिन्याला क्रिकेट चाहते आणि दिग्गजांच्या मतदानातून महिन्याभरात क्रिकेटच्या मैदानावर अप्रतिम कामगिरी करणाऱ्या एका पुरुष आणि महिला खेळाडूला ICC Players of the Month पुरस्काराने सन्मानित केले जाते. या पुरस्कारासाठी प्रेक्षक स्वत:ही मतदान करु शकतात. त्यासाठी काही महिनाभरातील अप्रतिम खेळाच्या जोरावर आयसीसी (ICC) तीन पुरुष आणि तीन महिलांची नावं नामांकित करते. त्यानंतर दिग्गजांची मतं आणि प्रेक्षकांच्या ऑनलाईन मतदानाद्वारे विजयी खेळाडू ठरतो. दरम्यान यंदा या पुरस्कारांसाठी महिला गटात दोन भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश होता तर पुरुष गटात दोन न्यूझीलंडच्या खेळाडूंचा समावेश होता. (Devon Conway and sophie ecclestone Won ICC Players of the Month June)

महिला गटात स्नेह राणा (Sneh Rana) आणि शेफाली वर्मा (Shefali Verma) या दोघी भारतीयांना पछाडून इंग्लंडच्या सोफी इक्लेस्टोनने (sophie ecclestone) बाजी मारली. तर पुरुष गटात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील (WTC Final) अप्रतिम कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडच्या डेवन कॉन्वेने साथीदार काईल जेमिसन आणि दक्षिण आफ्रिकेचा कॉन्टन डिकॉक (Quinton de Kock) यांना मागे टाकत मान पटकावला.

शेफाली आणि स्नेह यांची अप्रतिम कामगिरी

जून महिन्यातील ICC Players of the Month पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलेल्या शेफाली आणि स्नेह या दोंघीनी देखील इंग्लंड दौऱ्यावर अप्रतिम कामगिरी केली होती. शेफालीने कसोटी सामन्यात पहिल्या डावांत 96 आणि दुसऱ्या डावात 63 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यातही शेफालीने 78 धावा कुटल्या. दुसरीकडे स्नेहने कसोटी सामन्यात 82 धावांसह 4 विकेटही पटकावल्या आणि एकदिवसीय सामन्यातही तिने अष्टपैलू खेळी केली. विशेषता अखेरच्या सामन्यातील तिच्या 24 धावा भारतासाठी विजयी धावा ठरल्या. या दोघींच्या याच कामगिरीमुळे त्यांना नामांकित केले गेले होते.

हे ही वाचा –

ICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांतील कामगिरीचा फायदा

ICC Players of the Month : 3 एकदिवसीय सामने, 237 धावा, ‘या’ खेळाडूने मारली बाजी

M S Dhoni Birthday : क्रिकेटपटूंकडून धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव, विराटचं कॅप्शन मन जिंकणारं

(Devon Conway and sophie ecclestone Won ICC Players of the Month June)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI