IND vs NED T20 WC Score Updates and Highlights : भारताने नेदरलँडविरुद्धचा सामना 17 धावांनी जिंकला, पण झेल सोडल्याने संताप
India vs Netherlands, T20 world Cup 2026 Score Updates And Highlights In Marathi : टीम इंडियाने नेदरलँड्स विरुद्ध खेळलेले सर्व आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. आताही तसंच झालं. भारताने नेदरलँडला 17 धावांनी पराभूत केलं. पण नेदरलँडने चिवट झुंज दिली हे देखील विसरून चालणार नाही.

भारताने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात नेदरलँडला पराभवाची धूळ चारली. भारताने हा सामना 17 धावांनी जिंकला. खरं तर नेदरलँडने हा सामना सहज सोडला नाही. शेवटपर्यंत झुंज दिली. भारताने विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं होतं. पण नेदरलँडने 7 गडी गमवून 176 धावापर्यंत मजल मारली. यासह गट अ मध्ये भारतीय संघ टॉपला राहिला आहे. आता सुपर 8 फेरीत पहिलाच सामना तगड्या दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : भारताने नेदरलँडविरुद्धचा सामना 17 धावांनी जिंकला, पण झेल सोडल्याने संताप
भारताने नेदरलँडविरूद्धचा सामना 17 धावांनी जिंकला. या सामन्यात नेदरलँडने भारताला कडवी झुंज दिली. भारताने विजायासाठी 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण नेदरलँडने 7 गडी गमवून 176 धावा केल्या. या सामन्यात भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडलं. अशा चुका तगड्या संघाविरुद्ध करणं महागात पडू शकतं.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : नेदरलँडला सातवा धक्का
नेदरलँडला शिवम दुबेने सातवा धक्का दिला. झॅक लायन-कॅशेटला वॉशिंग्टन सुंदरने झेलबाद करून तंबूत पाठवलं त्याने 16 चेंडूत 26 धावा केल्या आणि बाद झाला.
-
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : नेदरलँड्सला सहावा झटका, कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स बोल्ड
जसप्रीत बुमराह याने नेदरलँड्सच्या कॅप्टनला बोल्ड केलं आहे. बुमराहने स्कॉट एडवर्ड्स याला बोल्ड केलं आहे. एडवर्ड्सने 10 बॉलमध्ये 15 रन्स केल्या.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : नेदरलँड्सला पाचवा झटका, टीम इंडिया मजबूत स्थितीत
शिवम दुबे याने बास द लीडे याला आपल्याच बॉलवर कॅच आऊट केलं. टीम इंडियाने अशाप्रकारे नेदरलँड्सला पाचवा झटका दिला आहे. बास द लीडे याने 23 बॉलमध्ये 33 धावा केल्या.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : वरुण चक्रवर्तीचा डबल धमाका, नेदरलँड्सला एकाच ओव्हरमध्ये दुसरा झटका
टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने धमाका केला आहे. वरुणने नेदरलँड्सला एकाच ओव्हरमध्ये सलग 2 झटके दिले आहेत. वरुणने कुलीन एकरमॅन आणि त्यानंतर आर्यन दत्त दोघांना आऊट केलं. मात्र वरुण हॅट्रिक बॉलवर विकेट घेण्यात अपयशी ठरला.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : बास द लीडे-कुलीन एकरमॅन जोडी जमली, नेदरलँड्स चांगल्या स्थितीत
बास द लीडे आणि कुलीन एकरमॅन ही जोडी जमली आहे. टीम इंडियाने नेदरलँड्सला 51 धावांवर दुसरा झटका दिला. त्यानंतर बास द लीडे आणि कुलीन एकरमॅन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 11 ओव्हरपर्यंत 82 धावांपर्यंत पोहचवलंय.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : वॉशिंग्टनकडून सुंदर कॅच, नेदरलँड्सला दुसरा झटका
वॉशिंग्टन सुंदर याने बाउंड्री लाईनवर सुरेख कॅच घेतला. सुंदरने मायकल लेविटचा कडक कॅच घेत त्याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मायकल लेविट याने 23 बॉलमध्ये 24 धावा केल्या.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : नेदरलँड्सला पहिला झटका, मॅक्स ओडॉड आऊट
वरुण चक्रवर्ती याने अखेर टीम इंडियाची प्रतिक्षा संपवली आहे. वरुणने मॅक्स ओडॉड याला क्लिन बोल्ड करत नेदरलँड्सला पहिला झटका दिला आहे. मॅक्स ओडॉड याने 20 धावा केल्या.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : नेदरलँड्सची सावध सुरुवात, टीम इंडिया पहिल्या विकेटच्या प्रतिक्षेत
नेदरलँड्सच्या सलामी जोडीने 194 धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली आहे. नेदरलँड्सच्या मायकेल लेविट आणि मॅक्स ओडॉड या जोडीने 4 ओव्हरमध्ये बिनबाद 22 धावा जोडल्या आहेत.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : नेदरलँडकडून मायकेल लेविट आणि मॅक्स ओडॉड जोडी मैदानात
नेदरलँडकडून मायकेल लेविट आणि मॅक्स ओडॉड जोडी मैदानात उतरली आहे. भारताने विजयासाठी 194 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. आता पावरप्लेमध्ये किती धावा करतात याकडे लक्ष लागून आहे.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : भारताचं नेदरलँडसमोर 194 धावांचं लक्ष्य, शिवम दुबेने सावरलं
भारताने नेदरलँडविरुद्ध 6 गडी गमवून 193 धावा केल्या. नेदरलँडसमोर विजयासाठी 194 धावांचं आव्हान आहे. आता या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे लक्ष्य लागून आहे. अभिषेक शर्मा या सामन्यातही शून्यावर बाद झाला. पण मधल्या फळीत शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : हार्दिक पांड्या बाद
शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याच्या भागीदारीमुळे टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हार्दिक पांड्याने उत्तुंग फटका मारला पण झेल बाद झाला. हार्दिक पांड्या 21 चेंडूत 30 धावा करून बाद झाला.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : शिवम दुबे बाद
शिवम दुबेच्या रुपाने टीम इंडियाला पाचवा धक्का बसला आहे. शिवम दुबेने 31 चेंडूत 66 धावांची खेळी केली. त्याचा बाउंड्री लाइनवर पकडला गेला. त्याच्या खेळीमुळे भारताचा डाव सावरला हे मात्र खरं आहे.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : शिवम दुबेचं चाबूक अर्धशतक, टीम इंडिया द्विशतकाच्या दिशेने
शिवम दुबे याने चौकार लगावत अर्धशतक पूर्ण केलं आहे. शिवमने 25 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केलं. टीम इंडियाच्या यासह 17 ओव्हरमध्ये 4 आऊट 153 झाल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया 200 धावांपर्यंत पोहचणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : शिवम-हार्दिकची फटकेबाजी, ऑलराउंडर जोडी जमली
टीम इंडियाने 16 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 133 धावा केल्या आहेत. टीम इंडियाची शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या ही ऑलराउंड जोडी मजली आहे. शिवम दुबे 33 आणि हार्दिक 13 धावांवर खेळत आहेत.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट, टीम इंडियाला चौथा झटका
नेदरलँड्सने टीम इंडियाला चौथा आणि मोठा झटका दिला आहे. नेदरलँड्सने भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला आऊट केलं आहे. सूर्याने 28 बॉलमध्ये 34 रन्स केल्या. सूर्याने या खेळीत 1 षटकार आणि 2 चौकार लगावले.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : शिवम दुबेची फटकेबाजी, टीम इंडियाचं शतक पूर्ण
टीम इंडियाचा ओपनर शिवम दुबे याने 13 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सिक्स लगावला. शिवमच्या या सिक्ससह टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण झाल्या. शिवमने या सिक्सआधी या ओव्हरमध्ये फोर आणि सिक्स लगावला. भारताला या ओव्हरमधून एकूण 19 धावा मिळाल्या.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : सूर्या-शिवम मैदानात, मुंबईकर जोडीवर मोठी जबाबदारी
टीम इंडियाने 11 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 76 धावा केल्या आहेत. मैदानात कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे ही मुंबईकर जोडी खेळत आहे. सूर्या 23 आणि शिवम 3 धावांवर नाबाद खेळत आहेत. भारताला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर या जोडीला निर्णायक भूमिका बजावावी लागणार आहे.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : भारताला तिसरा झटका, तिलक वर्मा आऊट, रोलॅफ व्हॅन डर मर्व्हकडून कडक कॅच
नेदरलँड्सचा अनुभवी खेळाडू रोलॅफ व्हॅन डर मर्व्ह याने हवेत झेप घेत तिलक वर्मा याचा सुरेख कॅच घेतला आहे. रोलॅफ व्हॅन डर मर्व्ह याने घेतलेल्या कॅचमुळे भारताला तिसरी विकेट गमवावी लागली. तिलकने 27 बॉलमध्ये 21 रन्स केल्या.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : बॅड लक, इशान किशन बोल्ड, टीम इंडियाला दुसरा झटका
टीम इंडियाचा स्टार फलंदाज इशान किशन दुर्देवीरित्या क्लिन बोल्ड झाला आहे. इशानच्या रुपात भारताने दुसरी विकेट गमावली आहे. इशान 7 बॉलमध्ये 18 रन्स करुन आऊट झाला.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : इशान-तिलक जोडी जमली, टीम इंडियाच्या किती धावा?
टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा सलग तिसऱ्यांदा झिरोवर आऊट झाला. त्यानंतर तिलक वर्मा इशान किशन याला साथ देण्यासाठी मैदानात आला. या जोडीने भारताला आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये 35 धावांपर्यंत पोहचवलं आहे. इशान 14 आणि तिलक 21 रन्सवर खेळत आहेत.
-
IND vs NED T20 WC Live Score Updates : अभिषेक शर्माकडून पुन्हा निराशा
अभिषेक शर्माकडून पुन्हा एकदा निराशा पदरी पडली आहे. सलग तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यातही त्याच्या शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली आहे. त्याने टी20 वर्ल्डकपमध्ये शून्यावर बाद होण्याची हॅटट्रीक केली.
-
IND vs NED T20 WC Live Updates : राष्ट्रगीताला थोड्याच मिनिटांत सुरुवात
टीम इंडिया-नेदरलँड्स सामन्याआधी दोन्ही देशाचं राष्ट्रगीत सुरु होणार आहे. राष्ट्रगीत पार पडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत सामन्याला सुरुवात होईल.
-
IND vs NED T20 WC Live Updates : नेदलँडची प्लेइंग 11
नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): मायकेल लेविट, मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, स्कॉट एडवर्ड्स (विकेटकीपर/कर्णधार), झॅक लायन-कॅशेट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, काइल क्लेन, नोहा क्रोस
-
IND vs NED T20 WC Live Updates : भारताची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग -
IND vs NED T20 WC Live Updates : काय म्हणाला नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स
नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स म्हणाला की, आम्ही फलंदाजी केली असती. ती चांगली खेळपट्टी दिसतेय. आमच्यासाठी हे आमचे अभियान चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याबद्दल आहे. आज फक्त संपूर्ण कामगिरी करण्याचा विचार करत आहोत. आमच्याकडे एक बदल आहे.
-
IND vs NED T20 WC Live Updates : काय म्हणाला कर्णधार सूर्यकुमार यादव?
सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. मैदान चांगले दिसते आहे. आम्हाला धावा काढायच्या आहेत आणि गोलंदाजांवर दबाव आणायचा आहे जेणेकरून ते एकूण धावसंख्येचा बचाव करतील. कॅम्पमधील मूड खरोखरच चांगला आहे आणि ते ज्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहेत मला त्यांना तसेच खेळवायचे आहे. प्रत्येक सामन्यात कोणीतरी चांगली कामगिरी करत आहे आणि ते पाहणे चांगले आहे. आमच्याकडे दोन बदल आहेत. कुलदीपऐवजी अर्शदीप आला आहे, तर अक्षर विश्रांती घेत आहे आणि वॉशिंग्टन आला आहे.
-
IND vs NED T20 WC Live Updates : नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, सूर्यकुमारने निवडली फलंदाजी
भारत आणि नेदरलँड यांच्यात साखळी फेरीतील शेवटचा सामना होत आहे. भारताने आधीच सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. त्यामुळे औपचारिक सामना असणार आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
IND vs NED T20 WC Live Updates : नेदरलँड्सची आतापर्यंतची कामगिरी
नेदरलँड्सला साखळी फेरीत आतापर्यंत 3 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. तर 2 सामन्यात नेदरलँड्सचा पराभव झाला आहे. नेदरलँड्सने नामिबियावर मात करत एकमेव विजय मिळवलाय. तर यूएसए आणि पाकिस्तानने नेदरलँड्सचा पराभव केला आहे.
-
IND vs NED T20 WC Live Updates : टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी
टीम इंडियाने आतापर्यंत साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने यूएसए, नामिबिया आणि पाकिस्तानला पराभूत केलं आहे. भारताने पाकिस्तानला पराभूत करत सुपर 8 फेरीत धडक दिलीय. त्यामुळे टीम इंडियाने नेदरलँड्स विरुद्ध विजयी चौकार लगावण्याची संधी आहे.
-
IND vs NED T20 WC Live Updates : टीम इंडिया नेदरलँड्सवर वरचढ
टीम इंडियाचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाचवा सामना आहे. टीम इंडियाने नेदरलँड्स विरुद्ध खेळल्या चारही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे नेदरलँड्स या सामन्यात कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
IND vs NED T20 WC Live Updates : भारत-नेदरलँड्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
-
IND vs NED T20 WC Live Updates : टी 20i वर्ल्ड कपसाठी टीम नेदरलँड्स
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर) मायकेल लेविट, मॅक्स ओ’डॉड,बास डी लीडे, कॉलिन अकरमन, झॅक लायन-कॅशेट, रोलोफ व्हॅन डर मर्वे, लोगान व्हॅन बीक, आर्यन दत्त,
काइल क्लेन, फ्रेड क्लासेन, नोहा क्रोस, साकिब झुल्फिकार, पॉल व्हॅन मीकरेन, टीम व्हॅन आणि डर गुगटेन. -
IND vs NED T20 WC Live Updates : टी 20i वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंग.
-
IND vs NED T20 WC Live Updates : टीम इंडिया सलग चौथ्या विजयसाठी सज्ज, नेदरलँड्स विरुद्ध भिडणार
भारत विरुद्ध नेदरलँड्स दोन्ही संघ आपल्या साखळी फेरीतील चौथ्या आणि अंतिम सामन्यात आमनेसामने आहेत. टीम इंडिया सूर्यकुमार याच्या नेतृत्वात अजिंक्य आहेत. तर नेदरलँड्स भारताला पराभूत करुन मोहिमेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.