IND vs NZ 1st ODI न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाने टॉस जिंकला, अशी आहे Playing 11

| Updated on: Jan 18, 2023 | 2:39 PM

IND vs NZ 1st ODI: आजपासून टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये वनडे सीरीज सुरु होत आहे. हैदराबादमध्ये पहिला सामना होत आहे. पहिल्या वनडेसाठी अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

IND vs NZ 1st ODI न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाने टॉस जिंकला, अशी आहे Playing 11
ind vs nz 1st odi
Follow us on

India vs New Zealand, 1st ODI Live Updates: न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर आली आहे. आजपासून दोन्ही टीममध्ये वनडे सीरीज सुरु होत आहे. सीरीजचा पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. न्यूझीलंडचा नियमित कॅप्टन केन विलियमसन या सीरीजचा भाग नाहीय. विकेटकीपर बॅट्समन टॉम लॅथमकडे टीमच नेतृत्व दिलय. टीम इंडियाचे दोन खेळाडू केएल राहुल आणि ऑलराऊंडर अक्षर पटेल या सीरीजमध्ये खेळत नाहीय. मागच्यावर्षातील शेवटच्या वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. बांग्लादेशने टीम इंडियाला 2-1 असं पराभूत केलं. त्यानंतर टीम इंडियाने नव्या वर्षाची दमदार सुरुवात केली.

कोणी जिंकला टॉस

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकलाय. त्याने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडची टीम प्रथम गोलंदाजी करणार आहे.

टीम इंडियाची प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

विजयी सुरुवातीच लक्ष्य

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये भारताने क्लीन स्वीप केलं. टीम इंडियाने 3-0 ने सीरीज जिंकली. आता न्यूझीलंड विरुद्ध सीरीजही अशाच प्रकारे जिंकण्याचा टीम इंडियाचा इरादा आहे.


रोहित-विराट दोघेही फॉर्ममध्ये

अंगठ्याला झालेल्या दुखापतीनंतर रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजमधून पुनरागमन केलं. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विराट कोहली सुद्धा फॉर्ममध्ये आहे. त्याने दोन शतक झळकावलीत. इशान किशनच्या जागी शुभमन गिलला संधी दिली. त्याने सुद्धा सलामीच्या जागेसाठी योग्य दावेदार असल्याच सिद्ध केलय. शुभमन गिलने एक शतक आणि अर्धशतक झळकावलं. तिरुअनंतपूरममध्य शुभमन गिलने सेंच्युरी ठोकली. त्यामुळे आजपासून न्यूझीलंड विरुद्ध सुरु होत असलेल्या सीरीजमध्ये तो सलामीला येईल.

इशान किशनची बॅटिंग पोजिशन बदलणार

इशान किशनला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये संधी मिळाली नाही. पण न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत त्याचा टीममध्ये समावेश केला जाईल. फक्त त्याची बॅटिंग पोजिशन बदलली जाणार आहे. रोहित शर्माने पत्रकार परिषदेत हे सांगितलं. इशान किशन न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात मीडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करताना दिसेल. बांग्लादेश विरुद्ध शेवटच्या वनडेमध्ये त्याने डबल सेंच्युरी झळकवली होती.