Suryakumar Yadav: कव्हर्स, मिडविकेट, फाइन लेग, या VIDEO मध्ये बघा सूर्याने न्यूझीलंडच्या बॉलर्सना कसं चोपलं

Suryakumar Yadav: कुठला बॉलर सूर्याला रोखणार? लिंकवर क्लिक करुन एकदा त्याची क्लासिक बॅटिंग तर बघा

Suryakumar Yadav: कव्हर्स, मिडविकेट, फाइन लेग, या VIDEO मध्ये बघा सूर्याने न्यूझीलंडच्या बॉलर्सना कसं चोपलं
Suryakumar yadav
Image Credit source: bcci twitter
| Updated on: Nov 20, 2022 | 5:59 PM

माऊंट माऊंगानुई: सूर्यकुमार यादवला यावर्षी रोखणं कठीण आहे. सूर्याला रोखणं कुठल्याही गोलंदाजीसाठी अवघड बाब आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 मध्ये सूर्याच्या बॅटिंगने सर्वांनाच अवाक केलं. न्यूझीलंडचे गोलंदाज आज सूर्यासमोर अक्षरक्ष: हतबल झाले. सूर्या मैदानात उतरतल्यानंतर धावांचा पाऊस पडला. 51 चेंडूत नाबाद 111 धावा फटकावल्या. त्याने 11 चौकार आणि 7 षटकार ठोकले.

सूर्याने मिडविकेट, कव्हर, फाईन लेग अशा सर्वच दिशांना चौफेर फटकेबाजी केली. या स्फोटक फलंदाजाने आपल्या तुफानी इनिंग दरम्यान वर्ल्ड रेकॉर्डही केला. सूर्याने सुरुवातीच्या 50 धावा 32 चेंडूत केल्या. पण नंतरच्या 50 धावा 17 चेंडूत फटकावून शतक पूर्ण केलं.

  1. सूर्या एकावर्षात टी 20 क्रिकेटमध्ये नॉन ओपनर हजार धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनलाय. त्याने 30 इनिंग्समध्ये 47.95 च्या सरासरीने 1151 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 188.37 चा होता. त्याने 9 अर्धशतक आणि 2 शतकं झळकावली.
  2. सूर्यकुमार यादव भारतीय कॅप्टन रोहित शर्मानंतर एकाच वर्षात 2 टी 20 शतक झळकवणारा भारतीय फलंदाज बनला आहे.
  3. सूर्याच्या नाबाद 111 धावा ही कुठल्याही भारतीय फलंदाजाची 20 क्रिकेटमधील चौथी मोठी इनिंग आहे. भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने याचवर्षी दुबईमध्ये
  4. अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद 122 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर रोहित शर्मा 118 धावांसह दुसऱ्या आणि स्वत: सूर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध 117 धावा फटकावल्या होत्या.
  5. सूर्यकुमार यादवने न्यूझीलंड विरुद्ध त्यांच्याच घरात शतक झळकावलं. याआधी त्याने इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्येच टी 20 सामन्यात शतक झळावल होतं.