Healthy Pizza Recipe: ना मैदा, ना कोणताही सॉस, असा तयार करा हेल्थी पिझ्झा, बाबा रामदेव यांची खास रेसिपी काय?
Baba Ramdev Health Pizza Recipe: बाबा रामदेव योग आणि आयुर्वेदाविषयी लोगांमध्ये जागरुकता आणत आहेत. ते सोशल मीडियावर सक्रीय आहेत. ते येथे आरोग्य आणि तंदुरुस्तीविषयतक टिप्स देतात. यावेळी योग गुरु रामदेव बाबा यांनी हेल्थी पिझ्झाची रेसिपी सांगितली आहे.

Health Pizza Recipe: योग गुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव हा दीर्घकाळापासून योग आणि आयुर्वेदाविषयी लोगांमध्ये जागरुकता आणत आहेत. ते सोशल मीडियावर सक्रीय आहेत. ते फिटनेसचे व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करतात. याशिवाय ते हेल्थी रेसिपी तयार करतात. त्याचे सेवनही ते करतात. त्यांनी एक हेल्थी पिझ्झा रेसिपी शेअर केली आहे. हिवाळ्यात पारंपारिक धान्य आणि भाजीपाला शरीरासाठी आणि आजारपणाविरोधात हा पिझ्झा चांगला ठरतो. बाबा रामदेव यांनी एक हेल्थी पिझ्झाची रेसिपी शेअर केली आहे.
सध्या फास्टफूड आणि जंक फूड हा ट्रेंडमध्ये आहे.लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पिझ्झा आवडीने खाते. पण त्याच्यातील मैदा, सॉस आणि त्यातील अनेक घटक शरीरासाठी नुकसानदायक ठरतात. आता हिवाळ्यात सुपरफूडचा वापर करून हिवळ्यात तुम्ही स्वादिष्ठ आणि निरोगी पिझ्झा बनवू शकता. त्याची रेसिपी बाबा रामदेव यांनी शेअर केली आहे.
बाबा रामदेव यांचा हेल्थी आणि देशी पिझ्झा
बाबा रामदेव यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये मार्केटमध्ये मिळणाऱ्या पिझ्झाविषयी माहिती दिली आहे. त्यांनी त्यांचा किस्सा शेअर केला. त्यानुसार, तो पिझ्झा त्यांना आवडला नाही. बाबा रामदेव यांनी सांगितले की, पिझ्झा पचण्यासाठी अनेक जण कोल्ड ड्रिंक पितात. त्यामुळे हा पिझ्झा पोटासाठी अत्यंत घातक असतो. त्यामुळे त्यांनी लोकांसाठी हेल्थी आणि देशी पिझ्झाची रेसिपी शेअर केली आहे.
हिवाळ्यात सुपरफूडने तयार केला देशी पिज्जा
या व्हिडिओत बाबा रामदेव यांनी बाजरीच्या पिठापासून पिझ्झा तयार करताना दिसले. बाजरी ही हिवाळ्यात शरीरासाठी चांगली मानल्या जाते. बाजरी उष्ण असल्याने ती शरीराला आतून गरम ठेवते. देशी पिझ्झा तयार करण्यासाठी घरीच बाजरीची भाकरी तयार करा. त्यावर चीज न वापरता लोणी लावा. त्यावर चटणी लावा. आता त्यावर भाजीपाला टाका आणि तयारा झाला घराचा आरोग्यदायी पिझ्झा.
बाजरी शरीरासाठी बहुपयोगी
बाजरीत अनेक पोषक तत्व असतात. यामध्ये तंतूमय पोष्टिक पदार्थ, प्रथिनं, लोह, मॅग्नेशियम, व्हिटामिन्स, अँटीऑक्सिडेंट सारखे पोषक तत्त्व असतात. बाजरीमुळे वजन नियंत्रीत राहण्यास आणि पाचन सुधारण्यास मदत होते. रक्तातील साखर नियंत्रीत ठेवण्यास आणि शरीरातील रक्ताची मात्रा कमी करण्यास मदत होते. खासकरून हिवाळ्यात आरोग्यासाठी बाजरी अत्यंत फायदेशीर मानल्या जाते.
