AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे यांना आधी हाकलून लावा, पाकिस्तानी खेळाडूंवर आफ्रिदी भयंकर खवळला, रागाने असं बोलून गेला की…

पाकिस्तान टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर पडला आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी खूपच सुमार कामगिरी केली आहे. त्यामुळेच एका माजी क्रिकेटपटून प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

अरे यांना आधी हाकलून लावा, पाकिस्तानी खेळाडूंवर आफ्रिदी भयंकर खवळला, रागाने असं बोलून गेला की...
pakistan player t20 world cupImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 03, 2026 | 7:22 PM
Share

ICC T-20 World Cup : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेची जगभरात चर्चा आहे. या स्पर्धेत भारताने उपान्त्य फेरीत मजल मारली आहे. येत्या 5 मार्च रोजी भारत आणि इंग्लंड यांच्याविरोधात सामना होणार आहे. क्रिकेटच्या मैदानातील भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला मात्र यावेळी फारची चांगली कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तान उपान्त्य फेरीपर्यंतही पोहोचू शकला नाही. दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंची ही खराब कामगिरी लक्षात घेऊन या खेळाडूंना दंड ठोठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. असे असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने पाकिस्तानाच्या खेळाडूंना चांगलेच सुनावले आहे. त्याने काही खेळाडूंना थेट बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, असं मोठं विधान केलं आहे.

पाकिस्तानी खेळाडूंना ठोठावण्यात आला दंड

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीने त्यांच्या खेळाडूवर तब्बल 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिस्तभंग केल्यामुळे नव्हे तर टी-20 विश्वचषकात चांगली कामगिरी न करू शकल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. एवढ्या मोठ्या फरकाने सामना गमवावा लागल्याने पाकिस्तानी खेळाडूंवर ही कारवाई करण्यात आली आहे.

शाहीद आफ्रिदी नेमकं काय म्हणाले?

पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेल्या शाहीद आफ्रिदी यांनी पाकिस्तानी खेळाडूंवर मोठा संताप व्यक्त केला आहे. त्यांनी 50 लाख रुपयांचा दंड खूपच कमी आहे. आणखी जास्त दंड लावायला हवा होता, असे मत आफ्रिदी यांनी व्यक्त केले. तसेच पाकिस्तानी संघातील काही खेळाडूंना थेट दोन-दोन वर्षांसाठी घरी बसवायला हवे. त्यांना संघात स्थान द्यायला नको, असेही आफ्रिदी म्हणाले आहेत.

फक्त एक खेळाडू चांगली कामगिरी करू शकला

दरम्यान, पाकिस्तानी संघातील सर्वच खेळाडूंवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. पाकिस्तानी संघातील शाहीदजादा फरहान या खेळाडूने चांगली कामगिरी केली. उर्वरित खेळाडू फार काही कमाल दाखवू शकलेले नाहीत. दरम्यान, आता शाहीद आफ्रिदी यांच्या या मताचा गांभीर्याने विचार केला जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील...
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संध
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संधी; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन...
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक...
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय...
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट...
Pune : बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट, अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
Water Level In Dams : पुढील 9 महिने पाण्याची चिंता वाढणार? राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?