IND vs NZ: काठी घेऊन भारतीय टीम समोर उभा राहिला, तोरंगामध्ये अशी झाली होती हालत….तुम्ही हा फोटो बघितला?

IND vs NZ: काही खेळाडूंना हे दुश्य पाहून प्रश्न पडला. खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे भावच सगळं काही सांगून जातात.

IND vs NZ: काठी घेऊन भारतीय टीम समोर उभा राहिला, तोरंगामध्ये अशी झाली होती हालत....तुम्ही हा फोटो बघितला?
Team india
| Updated on: Nov 20, 2022 | 12:01 PM

माऊंट माऊंगानुई: भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज दुसरा टी 20 सामना होणार आहे. पहिली मॅच पावसामुळे रद्द झाली होती. रविवारी 20 नोव्हेंबरला माऊंट माऊंगानुईच्या ओव्हल मैदानावर हा सामना होणार आहे. या मॅचसाठी खेळाडू तोरंगा शहरात दाखल झाले आहेत. त्यांच तिथे जोरदार स्वागत करण्यात आलं. टीमच्या स्वागतासाठी एका खास समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा दरम्यानचे काही फोटो बीसीसीआयच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेयर करण्यात आले आहेत.

पावसाच सावट

सीरीजचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. पावसामुळे टॉसही झाला नाही. क्रिकेट चाहत्यांना बे-ओवल मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या टी 20 मॅचकडून अपेक्षा आहेत. ही मॅच सुद्धा रद्द होऊ शकते. माऊंट माऊंगानुईमध्ये मॅच दरम्यान पाऊस कोसळू शकतो. न्यूझीलंडच्या स्थानिक वेळेनुसार हा सामना रात्री 7.30 वाजता सुरु होईल. त्यावेळी भारतात दुपारचे 12 वाजलेले असतील.

टीम इंडियासाठी स्वागत समांरभ

बीसीसीआयने काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. टीम माऊंट माऊंगानुई येथे पोहोचल्यानंतरचे हे फोटो आहेत. टीम दुसऱ्या टी 20 साठी माऊंट माऊंगानुई येथे पोहोचल्यानंतर ‘पोहिरी’ स्वागत झाले. हा सांस्कृतीक कार्यक्रम आहे. त्यात भाषण आणि गायन असते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी आयोजन करण्यात येतं. न्यूझीलंडच्या अनेक भागात ‘पोहिरी’ लोकप्रिय आहे.

काठी हातात घेऊन स्वागत

या समारंभादरम्यान एक व्यक्ती हातात काठी घेऊन उभा होता. हा या कार्यक्रमाचा भाग आहे. पण काही खेळाडूंना हे दुश्य पाहून प्रश्न पडला. बीसीसीआयने जे फोटो शेयर केलेत, त्यावरुन खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे भावच सगळं काही सांगून जातात.