
क्रिकेट चाहत्यांना जवळपास 1 महिन्याच्या प्रतिक्षेनंतर आणि 54 सामन्यांच्या थरारानंतर अखेर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी 2 संघ निश्चित झाले आहेत. न्यूझीलंड आणि यजमान भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने गुरुवारी इंग्लंडला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी असा विजय मिळवला. न्यूझीलंडची अंतिम फेरीत पोहचण्याची ही स्पर्धेच्या इतिहासातील एकूण दुसरी वेळ ठरली. तर टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा फायनलमध्ये पोहचण्याचा बहुमान मिळवला. इंडिया या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 4 वेळा अंतिम फेरीत पोहचणारी पहिली टीम ठरली.
आता टीम इंडिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघ वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे गतविजेता टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकणार की न्यूझीलंड पहिल्यांदा चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड महाअंतिम सामना रविवारी 8 मार्चला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड महाअंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड महाअंतिम सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड महाअंतिम सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तसेच टीव्ही9 मराठी वेबसाईटवर सामन्यातील प्रत्येक अपडेट्स लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेता येईल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड महाअंतिम सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एकूण 3 वेळा आमनेसामने आले आहेत. न्यूझीलंडने या तिन्ही सामन्यांत भारताला पराभूत केलं आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर न्यूझीलंडला विजयी चौकार लगावण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे.