AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ Final : राखीव दिवशीही सामना न झाल्यास न्यूझीलंड वर्ल्ड कप विजेता? जाणून घ्या नियम

India vs New Zealand Final Reserve Day : टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियासमोर अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान आहे. मात्र हा महाअंतिम सामना राखीव दिवशीही न झाल्यास विजेता कोण ठरणार? जाणून घ्या.

IND vs NZ Final : राखीव दिवशीही सामना न झाल्यास न्यूझीलंड वर्ल्ड कप विजेता? जाणून घ्या नियम
Narendra Modi Stadium AhmedabadImage Credit source: PTI
| Updated on: Mar 06, 2026 | 8:11 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी 5 मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये इंग्लंडवर उपांत्य फेरीतील सामन्यात सनसनाटी विजय मिळवला. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात या सामन्यात इंग्लंडला 7 धावांनी पराभूत करत सलग दुसऱ्यांदा सेमी फायनलचं तिकीट मिळवलं. आता टीम इंडिया अंतिम फेरीत किवी अर्थात न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. हा सामना रविवारी 8 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप गतविजेता आहे. त्यामुळे टीम इंडिया ट्रॉफी राखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत सेमी फायनल आणि फायनल सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद केलेली असते. निर्णायक सामन्याचा निकाल लागावा या हेतूने राखीव दिवसाची तरतूद केली जाते. त्यानुसार आयसीसीकडून ही विशेष तरतूद असते. अशात भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसाने विघ्न घातल्यास काय होणार? तसेच राखीव दिवसाचा नियम काय असणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

राखीव दिवस आणि अंतिम सामना

उभयसंघातील अंतिम सामना हा रविवारी 8 मार्चला मुख्य दिवशी होणार आहे. मुख्य दिवशी सामना न झाल्यास सोमवारी 9 मार्चला राखीव दिवशी खेळ होईल. महत्त्वाची बाब म्हणजे 9 तारखेला खेळाची सुरुवात तिथूनच होईल जिथे 8 मार्चला खेळ थांबवण्यात आला होता.

किमान 10 ओव्हरचा खेळ बंधनकारक

द्विपक्षीय मालिकेत सामन्याचा निकाल लागण्यासाठी डीएलएसनुसार किमान 5 षटकांचा खेळ होणं बंधनकारक असतं. दोन्ही संघांनी 5 ओव्हर खेळल्यास डीएलएसनुसार विजेता ठरवता येतो. मात्र हा अंतिम सामना आहे. आयसीसीच्या नियमानुसार, या सामन्याचा निकाला लावण्यासाठी किमान 10 षटकांचा खेळ होणं गरजेचं आहे.

राखीव दिवशीही विशेष वेळेची तरतूद

नियोजित वेळेनुसार मुख्य दिवशी सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणं अपेक्षित आहे. मात्र पाऊस किंवा इतर कारणांमुळे आयसीसीने पूर्ण 20 षटकांचा खेळ व्हावा यासाठी अंतिम सामन्यासाठी 90 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला आहे. तर राखीव दिवशी ही मुदत 120 मिनिटं अर्थात 2 तासांची आहे.

तसेच शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राखीव दिवशीही अंतिम सामना न झाल्यास भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात येईल.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?