Shardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार?

| Updated on: Jan 20, 2022 | 8:40 AM

याच्याआधी कपिल देव, अजित आगरकर आणि रवींद्र जाडेजाने अशी कामगिरी केली.

1 / 5
कसोटी मालिका गमावल्यानंतर पहिल्या वनडेमध्येही (First ODI) भारताचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) प्रथम फलंदाजी करताना 296 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 50 षटकात 265 धावा केल्या. 31 धावांनी भारताचा पराभव झाला. टीम इंडियाकडून शिखर धवन (Shikhar dhawan) आणि विराट कोहलीने अर्धशतकं झळकावली. त्याचवेळी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शार्दुल ठाकूरने आपल्या बॅटिंगने कमाल दाखवली. शार्दुलने 43 चेंडूत 50 धावा केल्या व वनडेमधलं पहिलं अर्धशतक झळकावलं.

2 / 5
पार्लमध्ये अर्धशतक ठोकून शार्दुलने आपली फलंदाजीची क्षमता दाखवून दिली. त्याने छोट्याशा करीयरमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये अर्धशतक झळकवण्याचा कारनामा करुन दाखवला आहे. शार्दुलने आपलं पहिलं अर्धशतक गाबामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलं होतं. ओवलच्या मैदानावर शार्दुलने सलग दोन अर्धशतक झळकावली आहेत. आता दक्षिण आफ्रिकेतही त्याने अर्धशतक फटकावलं.

3 / 5
लोअर ऑर्डरमध्ये खेळणाऱ्या शार्दुलने SENA देशांविरोधात वनडे-टेस्ट फॉर्मेटमध्ये अर्धशतक झळकावली आहेत. याच्याआधी कपिल देव, अजित आगरकर आणि रवींद्र जाडेजाने अशी कामगिरी केली.

4 / 5
शार्दुलने जी हाफ सेंच्युरी केली, तसं अर्धशतक वनडे क्रिकेटमध्ये 21 वर्षानंतर बघायला मिळालं आहे. शार्दुलने शेवटच्या चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले पण टीम इंडियाचा पराभव झाला. यापूर्वी वर्ष 2001 मध्ये असं झालं होतं.  डगलस मॅरेलियरने ज्या चेंडूवर अर्धशतक झळकावलं, त्याचवेळी झिम्बाब्वेचा पराभव झाल होता.

5 / 5
बॅटने कमाल दाखवणारा शार्दुलने बॉलिंगमध्ये मात्र फ्लॉप ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने 10 षटकात 72 धावा दिल्या. शार्दुलने तीन नो बॉल टाकले. त्यात दोन फ्री हिटवर षटकार ठोकले.