IND VS SA: जबरदस्त, बुमराह-शामीचे बॉल शेकले पण हार न मानता एल्गरने झळकावलं झुंजार अर्धशतक

| Updated on: Jan 06, 2022 | 8:47 PM

बुमराह, शामी, ठाकूर या वर्ल्ड क्लास गोलंदाजांसमोर एल्गर जिद्दीने उभा राहिला व गरज असताना संघासाठी अर्धशतकी खेळी केली.

IND VS SA: जबरदस्त, बुमराह-शामीचे बॉल शेकले पण हार न मानता एल्गरने झळकावलं झुंजार अर्धशतक
Follow us on

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने झुंजार अर्धशतक झळकावलं आहे. एल्गरच्या फलंदाजीच्या शैलीमध्ये फुटवर्क आणि कलात्मकतेचा अभाव आहे. पण हार न मानण्याची जिद्द ठासून भरली आहे. त्याचाच प्रत्यय आज वाँडर्सच्या खेळपट्टीवर आला. गोलंदाजांना अनुकूल असणाऱ्या या विकेटवर एल्गरने झुंजार अर्धशतक झळकवून सहकाऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. (india vs South Africa johannesburg wanderers stadium 2nd test dean elgar smashed half century)

बुमराह, शामी, ठाकूर या वर्ल्ड क्लास गोलंदाजांसमोर एल्गर जिद्दीने उभा राहिला व गरज असताना संघासाठी अर्धशतकी खेळी केली. या खेळपट्टीवर फलंदाजी इतकी सोपी नव्हती. कारण बॅटिंग करताना एल्गरला अनेकदा बॉल लागला. तिसऱ्या दिवशी एल्गरच्या हेल्मेटला बॉल लागला. मानेकडे चेंडू लागला. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर चेंडू शेकले.

पण एल्गरने मैदान सोडलं नाही. तो टिकून राहिला. सहकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या छोट्या-छोट्या भागीदाऱ्याकरुन संघाला विजयाच्या समीप नेल. कठीण काळात नेहमीच एल्गरने आपल्या फलंदाजीचा स्तर उंचावला आहे. चौथ्या डावात एल्गर एखाद्या योद्ध्यासारखा लढत आहे.