AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Sri Lanka, 1st ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका क्रिकेट संघातील सामना काही तासांतच सुरु होणार आहे. शिखर धवन पहिल्यांदाच भारताचे कर्णधारपद सांभाळणार असल्याने आज नेमकी तो कशी रणनीती आखतो ते पाहावे लागेल.

India vs Sri Lanka, 1st ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
भारतीय संघ
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 10:19 AM
Share

कोलंबो : भारतीय संघाचा नवनिर्वाचित कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली आजपासून भारतीय संघ (Indian Cricket Team) श्रीलंका दौऱ्याची (Sri Lanka Tour) सुरुवात करेल. कोलंबोच्या आर. प्रेमादासा स्टेडियममध्ये (R Premadas Stadium) आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या सिरीजमधील पहिला सामना खेळवला जाईल. भारतीय टीमचं कर्णधारपद शिखर धवन तर उपकर्णधारपद भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) साभांळणार आहे. तर श्रीलंकेचा कर्णधारही बदलण्यात आला असून अष्टपैलू खेळाडू दासुन शनाका (Dasun Shanaka) कर्णधार असेल.

भारतीय संघ आजचा सामना विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसारख्या महत्त्वाच्या खेळांडूशिवाय खेळेल. तर श्रीलंका संघातही त्यांचे महत्त्वाचे फलंदाज कुसल परेरा, निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस आणि दनुष्का गुणथिलाका नसल्याने इतर खेळाडूंवर ताण पडणार आहे. श्रीलंका क्रिकेटने वरील तीन महत्त्वाच्या फलंदाजाना इंग्लंड दौऱ्यात कोविड -19 बायो बबलचे उल्लंघन केल्याप्रकरणी  निलंबित केलं असून कुसल परेरा दुखापतीमुळे सामन्याबाहेर आहे.

सामना कुठे खेळविला जाणार

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली एकदिवसीय सामना रविवार, 18 जुलै रोजी कोलंबोच्या आर. प्रेमादासा मैदानावर खेळवला जाईल.

सामन्याला कधी सुरुवात होणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल.

सामना कुठे पाहणार?

भारत आणि श्रीलंका संघ यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील या सामन्याचं Live Streaming SONY LIVE वर असेल.

संबंधित बातम्या 

IND vs SL : श्रीलंका संघाकडून एकदिवसीय सामन्यांसाठी संघाची घोषणा, ‘या’ अष्टपैलू खेळाडूला सोपवलं कर्णधारपद

IND vs SL : सामना सुरु होण्याआधीच श्रीलंका संघाला दोन झटके, हे दोन खेळाडू सामना खेळण्यापासून मुकणार

(India vs Sri Lanka 1 Odi Live Streaming when and where to Watch online free in Marathi)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.