IND vs SL : श्रीलंका संघाकडून एकदिवसीय सामन्यांसाठी संघाची घोषणा, ‘या’ अष्टपैलू खेळाडूला सोपवलं कर्णधारपद

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka 2021) संघात 18 जुलैपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी नुकताच आपला संघ श्रीलेकने जाहीर केला आहे.

IND vs SL : श्रीलंका संघाकडून एकदिवसीय सामन्यांसाठी संघाची घोषणा, 'या' अष्टपैलू खेळाडूला सोपवलं कर्णधारपद
दासुन शनाका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात 18 जुलैला पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार असून सामन्याच्या दोन दिवसांआधीच श्रीलंका क्रिकेट संघाने (Sri Lanka Cricket Team) एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांसाठीचा 24 सदस्यीय संघ जाहिर केला आहे. संघाचा कर्णधार विकेटकिपर कुसल परेरा (Kusal Perera) याला दुखापतीमुळे मालिकेबाहेर जावे लागल्याने संघाने नवा कर्णधारही नेमला आहे.

संघातील अष्टैपूल खेळाडू दासुन शनाका (Dasun Shanaka) याला नवा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. संघाचा माजी कर्णधार कुसल परेरा याला इंग्लंड दौऱ्यावरु परतल्यानंतर सरावादरम्यान खांद्याला दुखापत झाल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. सोबतच परेराच्या कर्णधारीखाली संघाचे प्रदर्शनही खास नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्णधार सोडता संघाने जास्त काही बदल केले नसून इंग्लंड दौैऱ्यातील बहुतेक खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे.

4 वर्षात 10 वा कर्णधार!

शनाका हा श्रीलंका संघाचा मागील 4 वर्षांतील 10 कर्णधार आहे. सततच्या खराब कामगिरीमुळे 2017 पासून श्रीलंका संघ सतत कर्णधार बदलत आहे. 29 वर्षीय शनाकाने आतापर्यंत श्रीलंका संघासाठी 28 वनडे आणि 43 टी-20 सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याने 611 धावांसह 10 विकेट घेतले आहेत.तर टी-20 मध्ये 548 धावांसह 11 विकेट्स पटकावले आहेत. शनाकाला कर्णधारपद दिले असून धनंजय डिसिल्वा याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

एकदिवसीय आणि T20 मालिकेसाठी श्रीलंका संघ

दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा (उपकर्णधार), पतुम निसंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, चरित असालंका, वानिंडु हसारंगा, अशेन भंडारा, मिनोद भानुका, लाहिरु उडारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुष्मंता चमीरा, लक्षन संदाकन, अकिला धनंजय, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षन, इशान जयरत्ने, प्रवीण जयाविक्रमा, असिता फर्नांडो, कसुन रजीता, लाहिरु कुमारा, इसुरु उदाना.

संबंधित बातम्या 

IND vs SL : सामना सुरु होण्याआधीच श्रीलंका संघाला दोन झटके, हे दोन खेळाडू सामना खेळण्यापासून मुकणार

T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहीर, भारतासोबत गटात ‘हे’ संघ, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर

IND vs SL : सामना सुरु होण्याआधीच श्रीलंका संघाला दोन झटके, हे दोन खेळाडू सामना खेळण्यापासून मुकणार

(Sri Lanka Cricket Team Announced there Squad for one day and T20 Series against india Dasun Shanaka is new Captain)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI