IND vs SL 3rd ODI: Rohit sharma ने टॉस जिंकला, हार्दिक पंड्या बाहेर, अशी आहे Playing 11

| Updated on: Jan 15, 2023 | 1:17 PM

IND vs SL 3rd ODI: टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये आज वनडे सीरीजचा तिसरा सामना होणार आहे. तिरुवनंतपुरममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाने पहिला वनडे सामना 67 धावांनी जिंकला होता.

IND vs SL 3rd ODI: Rohit sharma ने टॉस जिंकला, हार्दिक पंड्या बाहेर, अशी आहे Playing 11
Team India
Image Credit source: Social Media
Follow us on

IND vs SL 3rd ODI: टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये आज वनडे सीरीजचा तिसरा सामना होणार आहे. तिरुवनंतपुरममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाने पहिला वनडे सामना 67 धावांनी जिंकला होता. दुसऱ्या वनडेमध्ये 4 विकेटने विजय मिळवला. सीरीजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी टीम इंडियाकडे आहे. टीम इंडियाची नजर आता क्लीन स्वीपवर असेल. टीम इंडियाने सीरीज जिंकलीय. त्यामुळे आज तिसऱ्या वनडेत बेंचवर बसलेल्या प्लेयर्सना टीम इंडिया संधी देऊ शकते.

कोण जिंकलं टॉस?

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या मॅचसाठी टीम इंडियात आज दोन बदल करण्यात आले आहेत.

टीम इंडियात दोन बदल

हार्दिक पंड्या आणि उमरान मलिकला बाहेर बसवलय. त्यांच्याजागी सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदरला संधी दिलीय.

विराटसाठी खास सामना

विराट कोहली आज श्रीलंकेविरुद्ध 50 वा वनडे सामना खेळणार आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध 49 सामन्यात 2337 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 11 हाफ सेंच्युरी आणि 9 शतकं झळकवली आहेत.

भारताची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर

श्रीलंकेची प्लेइंग XI: अविष्का फर्नांडो, एन. फर्नांडो, कुसल मेंडिस, आसेन बनडारा, चरिथ असालंका, दसुन शनाका (कॅप्टन), वानिंदु हसारंगा, जेफरे वॅनडरसे, कसुन रजित, चामिका करूणारत्ने, लाहिरू कुमारा


पहिल्या वनडेत कोण हिट? कोण फ्लॉप?

पहिल्या वनडे मॅचमध्ये विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिलने अर्धशतकं फटकावली. कोलकाता येथील दुसऱ्या वनडे सामन्यात मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवने गोलंदाजीत कमाल केली. कुलदीपने तीन विकेट काढल्या. त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. दुसऱ्या वनडेत भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले होते. केएल राहुलने झुंजार अर्धशतक झळकावल. त्यामुळे टीम इंडियाने 4 विकेटने सामना जिंकला.

खेळपट्टी कोणाला अनुकूल ठरणार?

तिरुवनंतपुरमच्या स्टेडियमवर सप्टेंबर 2022 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेत टी 20 सामना झाला होता. या मॅचमध्ये दोन्ही बाजूच्या बॉलर्सनी चांगली कामगिरी केली होती. भारताने त्या मॅचमध्ये पहिली गोलंदाजी केली. अवघ्या 9 रन्समध्ये दक्षिण आफ्रिकेच्या 5 विकेट काढल्या होत्या. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने भेदक मारा केला होता. त्याने टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याला आजच्या मॅचसाठी टीममध्ये स्थान देण्यास हे एक कारण आहे.